जय पेरसापेन हायस्कूल,माळंदा येथे ” करिअर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न..

  भाविक करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधी 

        शुक्रवारला जय पेरसापेन हायस्कूल माळंदा,ता.धानोरा जि.गडचिरोली येथे गट साधन केंद्र धानोरा,हरिओम कॉम्प्युटर धानोरा व महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पूणे अंतर्गत” करिअर मार्गदर्शन कार्यशाळा ” आयोजित करण्यात आली होती.

        कार्यशाळेत वर्ग 8 ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना पूढील शैक्षणिक सत्रात करिअर संबधात कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत या संबंधाने करिअर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आले.

       कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी गट साधन केंद्र धानोरा येशील सौ.दुगा मँडम,सौ.धाईत मँडम व हरिओम कॉम्प्युटर धानोरा येथील संचालक भास्कर कायते,शेखर इवनाथे सर हे मार्गदर्शक होते.

        तर कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक ए.एन.बढई सर होते.

       मार्गदर्शक महोदयांनी विद्यार्थ्यांना करिअर विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.प्रास्ताविक शाळेतील सहा. शिक्षक सि.डी.गद्देवार तर संचालन कु.ए.बी.शेख यांनी केले. 

        आभार प्रदर्शन एस.पी.मारकवार यांनी मानले.कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.