कन्हान येथील इंदिरा नगर परिसरात भरदिवसा चोरी.. — ४ लाख ९३ हजार रुपयाचे सोन्याची व चांदीचे दागिने गेले चोरीला..

     कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत इंदिरा नगर परिसरात भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरात शिरुन चार लाख रुपये पेक्षा अधिक सोने चांदीचा मुद्देमाल चोरुन नेला असल्याची खळबळजनक घटना घडली.पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .

          प्राप्त झालेल्या माहिती नुसार शुक्रवार (दि.९) फेब्रुवारीला सकाळी ९ वाजताच्या दरम्यान 

सौ.इंदिरा मुरलीधर चिखले (वय ५५) रा.कन्हान ही आपल्या नातेवाईक यांचे घरी निधन झाल्याने गेली होती.

          घरच्या समोरच्या दाराला कुलूप लावले होते आणि मागचा दरवाजा उघडा होता.महिलेचे पती मुरलीधर चिखले हे घराचे बांधकाम सुरू असल्याने घरासमोर बसले होते.दुपारी ३ वाजताच्या दरम्यान इंदिरा चिखले घरी परत आली व आंघोड करून परत घराशेजारी हळदी कुंकुचे कार्यक्रमात जायचे असल्याने तयारी करीता घरातील बेडरुम मध्ये गेली आणि खोलीत ठेवलेल्या ३ पिशव्या व जाभळ्या रंगाची हॅन्डबॅंग चेक केले असता,त्यात ठेवलेले १) सोन्याचे पोत ४० ग्राम , २) सोन्याचा बकूडी हार ३५ ग्राम, ३) सोन्याचा मणी ६ ग्राम, ४) सोन्याचा गोप १५ ग्राम, ५) सोन्याचा नथ २ नग ६ ग्राम, ६) सोन्याचे डोरले २ ग्राम, ७) सोन्याचा ओम लिहिलेला लॉकेट १ ग्राम, ८) सोन्याचे टॉप्स कानातले ८ ग्राम, ९) सोन्याचे छोटे टॉप्स ३ ग्राम, १०) सोन्याचे कानातले जोडी टॉप्स ७ ग्राम असा एकूण सोना १२३ ग्राम एवज किंमत ४ लाख ९२, हजार रुपये व चांदिचे मनगटे व चाळ जुने वापरते एकूण ३५ ग्राम,मेंमती १४०० रु.असा एकूण ४,९३,४०० रुपयांचा मुद्देमाल दिसुन आलेला नाही.

         सदर चोरी प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी तक्रारदार सौ.इंदिरा चिखले यांच्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध ६६/२४ कलम ३८० भांदवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असून आरोपीचा शोध घेत आहे.