पत्रकार गौतम गेडाम यांना धक्काबुक्की करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल.. — आईच्या विरोधात बातमी छापली म्हणून केली धक्काबुकी..

अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधि 

          सिंदेवाही :- बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय सिंदेवाही अंतर्गत मोहाडी सर्कल मधील पर्यवेक्षिका यांनी अंगणवाडी सेविकांना त्रास देत असल्याची तक्रार प्राप्त होताच त्या प्रसंगानुरूप बातमी प्रसिद्ध करणाऱ्या एका पत्रकाराला शिवीगाळ करून धक्काबुक्की करणाऱ्या सौरभ अरविंद हेमके या युवकावर विविध कलमा अंतर्गत सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.

                बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातंर्गत मोहाडी सर्कलच्या पर्यवेक्षिका प्रेमिला अरविंद हेमके या कार्यरत असून मागील अनेक दिवसापासून या सर्कलमधील अंगणवाडी सेविकांना आर्थिक आणि मानसिक त्रास देत आहेत.

            त्यामुळे तेथील १६ अंगणवाडी सेविका एकत्र येऊन पर्यवेक्षिका प्रेमिला हेमके यांची तक्रार देण्यासाठी मोहाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा एका डिजिटल पोर्टल साठी वृत्तांकन करणारे गौतम गेडाम यांचे सहकार्य घेतले आणि पर्यवेक्षिका यांची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय चंद्रपूर येथे दाखल केली.

           दुसऱ्या दिवशी त्याबाबतचे वृत्त साप्ताहिक विचारपीठ या पोर्टल माध्यमातून प्रकाशित केले. त्यामुळे पर्यवेक्षिका प्रेमिला हेमके यांना राग आला व गौतम गेडाम याना मारझोड करण्यासाठी आपल्या गुंड प्रवृत्तीच्या मुलाच्या साहाय्याने गेडाम यांचा मोहाडी गावात शोधाशोध केली. 

         परंतु गेडाम हे मोहाडी येथे भेटले नाही म्हणून पर्यवेक्षिका यांचा मुलगा सौरभ हा सिंदेवाही येथे शोध घेत असताना पंचायत समिती कार्यालय जवळ गौतम गेडाम हे दिसताच त्यांच्या जवळ सौरभ हेमके आला व तू माझ्या आईची बातमी का लावली? तू अंगणवाडी सेविकांना तक्रार देण्यासाठी मदत का केली? असे बोलून यांनी गेडाम यांना गाडीत बसण्यासाठी जबरजास्ती केली.

           मात्र गेडाम यांनी गाडीत बसण्यास नकार देताच पर्यवेक्षिकेचा मुलगा सौरभ हा गौतम गेडाम यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याठिकाणी काही पत्रकार मंडळी उपस्थित असल्याने सौरभ यांनी गौतम गेडाम यांना मारझोड केली नाही.

          गौतम गेडाम यांनी सदर घटनेची सिंदेवाही पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी भांदवी कलम २९४, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस स्टेशन मार्फत सुरू आहे.