Home देशविदेश बूट कुणाला मारलाय?  — छडयंत्र?

बूट कुणाला मारलाय?  — छडयंत्र?

दखल न्यूज भारत…

     पायातली चप्पल,नरकाचं द्वार,चूल आणि मुल यामध्येच अडकून न राहणाऱ्या बाईला बूट मारलाय. 

     शिक्षण घेऊन अर्थार्जन करणाऱ्या सावित्रीच्या लेकीला बूट मारलाय. 

      ज्या इंग्लंड अमेरिकेत बाईला मताधिकार मिळवण्यासाठी आंदोलन करावी लागली,”तो मताधिकार फुकटात मिळालेल्या भारतीय बाईला बूट मारलाय….

       राजा का बेटा राजा नही,जो योग्य है वहि राजा बनेगा अशी खात्री देणाऱ्या,”संविधानाला,बूट मारलाय….

माणसं,सरकार,व्यवस्था,कार्यपालिका कुणाकडूनही अन्याय झाला तर ज्या न्यायपालिकेचा सामान्य माणसाला शेवटचा आधार वाटतोय त्या न्यायपालिकेच्या तोंडावर बूट मारलाय. 

     जन्म या अपघाताने तुम्ही कोणत्याही धर्मात,वंशात, जातीत जन्मला असला तरी तुमच रक्त लाल आहे,माणसांची सगळी लेकरं समान आहेत,हे सांगणाऱ्या,”राज्यघटनेवर,बूट मारलाय.

        माणसाला आपल्या माणूस असण्याचे भान देणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना बूट मारलाय… 

समता,सहिष्णुता,बंधुभाव,लोकशाही,धर्मनिरपेक्षता या सगळ्या मुलभूत तत्वांच्या तोंडावर बूट मारलाय.एवढेच नव्हे तर…

      राजमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज,राजमाता अहिल्यादेवी,महात्मा ज्योतिबा फुले,राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांना मानणाऱ्या प्रत्येक माणसाच्या तोंडावर बोट मारलाय.

       माणूसपणा,शहाणपण शाबूत असलेल्या प्रत्येक माणसाच्या थोबाडावर बूट मारलेला आहे !

    बूट कुणी मारलाय? 

     — ज्यांनी शंबुक मारला….

     — ज्यांनी चार्वाक जाळला…

      — ज्यांनी एकलव्याचा अंगठा मागितला…..

     — ज्यांनी ज्ञानेश्वर माउलींना वाळीत टाकलं…..

    — ज्यांनी चक्रधरांचा खून केला…. 

    — ज्यांनी तुकारामाचा खून केला….

       — ज्यांनी एकनाथांच्या मुलाला जिवंतपणी बापाचा दिवस घालायला लावला…

 — ज्यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला…

  — ज्यांनी जिजामातेचं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला… 

 — ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीनुसार करायला लावली अन् गुढी उभारली…

— ज्यांनी ज्योतिबा – सावित्रीमाईंवर शेणाचे गोळे फेकले… 

— ज्यांनी राजर्षीं महाराजांबद्दल घाणेरडे विनोद पसरवले…

— ज्यांनी आगरकरांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढली.. 

— ज्यांनी गांधीजींची हत्या केली… 

— ज्यांनी पत्री सरकारचे क्रांतिकारक पकडून दिले,…

— ज्यांनी माणसाचं माणूसपण नाकारलं…

 — ज्यांनी समता नाकारली…

— त्यांनी प्रत्येक भारतीयांच्या थोबाडावर बूट फेकून मारला आहे !

      आणि नुसता बूट फेकून मारलेला नाही,तर तुम्हाला म्हणजे भारत देशातील ओबीसी,एससी एसटी,अल्पसंख्याक,इतर मागासवर्गीय यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे. “ हिंदू म्हणून तुम्ही कितीही उड्या मारल्या आणि कितीही बलिदानं दिली,त्याग केला,स्वतःच्या बोकांडी कोर्ट कज्जे खटले घेतले,लोकांची डोकी फोडली तरीही तुम्ही आमच्या बरोबरीला नाहीत,तुम्ही शुद्र आहात. 

     ‘गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही’ हेच अंतिम सत्य आहे. “ 

    “त्यांनी बूट तुमच्या थोबाडावर फेकला आहे.तुमच उत्तर काय असाव हे संविधानाने सांगितलेलं आहे!

        ज्यांना सनातन शब्दाचा अर्थ माहित नाही अशा बिनडोक सनातनी ब्राम्हण जातीयवादी मानसिकतेचा निषेध करावा तेवढा कमीच आहे…

          याचबरोबर भारत देशातील नागरिकांना म्हणजेच मुल निवासी नागरिकांनी जातीयवादी आणि वर्णव्यवस्थावादी भांमट्यापासून सतर्क होणे व सावध राहणे आवश्यक झाले आहे.

        तद्वतच त्यांच्या कुठल्याही सामाजिक चळवळीला आणि राजकीय पक्षांना समर्थन देणे बंद केले पाहिजे.तद्वतच जातीयवाद आणि वर्णव्यवस्थावाद जोपासणाऱ्या राजकीय पक्षांना दूर लोटले पाहिजे….

         या देशातील बहुजन समाजातील नागरिकांचे सहकार्य घेत (हिंदू समाजबांधवांचे),मनुवादी लोक भारत देशांतर्गत वर्णव्यवस्था व जातीवादाला पोषक वातावरण तयार करतात व बहूजन समाजातील नागरिकांना,युवकांना,महिला भगिनींना,युवतींना,”जसे आहात तसेच रहा तूम्ही!,या धोरणानुसार ते कृती करतात, काम व कार्य करतात,हे स्पष्ट आहे.

       पण,भारतीय संविधानाने या देशातील बहुजन नागरिकांना विशेष अधिकार बहाल करुन त्यांचे संरक्षण केले आहे, म्हणूनच मनुवाद्यांची आणि अयोग्य ब्राह्मणवाद्याची जळफळाट होते….

      म्हणूनच ते बहुजन समाजातील संत-महापुरुषांचा अपशब्दात नेहमी अपमान करीत राहतात,बिडंबना करीत राहतात आणि योग्य व उच्च पदस्थ व्यक्तीला कुठल्यातरी घटना अंतर्गत ते बदनाम करीत राहतात…

     ( मुख्य संपादक प्रदीप रामटेके यांच्या सुचनेनुसार सदर लेख प्रकाशित करण्यात येत आहे…)