Home सांस्कृतिक प्रेमाने भगवंताची भक्ती करून परमार्थ करा :- श्री गुरु भानु प्रसाद महाराज...

प्रेमाने भगवंताची भक्ती करून परमार्थ करा :- श्री गुरु भानु प्रसाद महाराज देहुकर…

  बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

        भरतरी नाथाच्या पावन भूमीमध्ये कैलासवासी बाबुराव जगदाळे यांच्या चौदावे पुण्यस्मरणा निमित्त श्री गुरु भानु प्रसाद देहुकर महाराज पंढरपूर यांची किर्तन सेवा टाळ आणि मृदंगाच्या गजरात उत्साहात संपन्न झाली.

          किर्तन सेवे प्रसंगी भानू प्रसाद देहुकर महाराज पुढे बोलत आसताना म्हणाले की, मनुष्य जीवनामध्ये परमार्थ करून भगवंत आपलासा करावा म्हणजे देवाची प्राप्ती होऊन प्रत्यक्षात भगवंताची भेट होत आसते. श्री गुरु भानु प्रसाद देहुकर महाराज यांचे टणु येथील कीर्तन सेवे प्रसंगी उदगार.

           टणु तालुका इंदापूर येथील भावी सरपंच व प्रगतशील बागायतदार ह भ प आगंद महाराज जगदाळे व त्यांचे बंधू सहित संपूर्ण जगदाळे परिवाराच्या वतीने, कैलासवासी बाबुराव दशरथ जगदाळे यांचे पुण्यस्मरण मोठ्या उत्साहात करण्यात आले. या टणु गावांमध्ये जगदाळे परिवाराच्या वतीने सालाबाद प्रमाणे एवढा मोठा किर्तन सोहळा केल्यामुळे शेकडो भाविक भक्त, टाळकरी, विनेकरी, मृदुंग वादक, आणि ग्रामस्थ, आजी माजी सरपंच, उपसरपंच, मान्यवर व महिला भगिनी, सहित मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाविक उपस्थित होते.

        नरसिंहपुर, टणु, गिरवी, ओझरे, संगम, गारआकोले, टाकळी, गणेशवाडी, बावडा सराटी, गोंदी, पिंपरी बुद्रुक, चव्हाण वस्ती, आडोबा वस्ती, सहित सर्व ग्रामस्थ व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

         किर्तन सेवेनंतर शेवटी महाप्रसाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.