आरमोरी येथे बसपाचा कार्यकर्ता मेळावा (समीक्षा बैठक ) संपन्न.. छत्रपती शाहूजी महाराज जयंती उत्सव साजरा… सत्कारमूर्ती श्री भिमराज पात्रीकर यांचा यथोचित सत्कार…

अश्विन बोदेले 

तालुका प्रतिनिधी 

दखल न्यूज भारत

 

आरमोरी :- बहुजन समाज पार्टी आरमोरी विधानसभेच्या अंतर्गत आरमोरी येथे बसपा कार्यकर्त्यांची समीक्षा बैठक नुकतीच पार पडली. 

बहुजन समाज पार्टी आरमोरी विधानसभेच्या वतीने दिनांक 9 जुलै 2023 ला छत्रपती शाहूजी महाराज जयंती उत्सव निमित्ताने बहुजन समाज पार्टी कार्यकर्ता मेळावा (समीक्षा बैठक) चे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करण्यात आले. व छत्रपती शाहूजी महाराज जयंती उत्सव साजरा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून बसपाचे महाराष्ट्राचे राज्य प्रभारी  भीमजी राजभर साहेब हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून एड्.सुनील डोंगरे प्रदेश प्रभारी, डी. एस. रामटेके प्रदेश सचिव, प्रदीप जी खोब्रागडे जिल्हा प्रभारी बसपा गडचिरोली,  शंकर बोरकुट जिल्हाध्यक्ष बसपा गडचिरोली ,  कृपानंद सोनटक्के आरमोरी विधानसभा अध्यक्ष बसपा,  जयद्रथ बोदेले महासचिव आरमोरी विधानसभा बसपा, तसेच आरमोरी विधानसभेतील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते शेकडो च्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाला उपस्थित काही काही सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी यांचे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले. त्यामध्ये सत्कारमूर्ती भीमराज पात्रीकर सर सेवानिवृत्त केंद्रप्रमुख,विजय ठवरे सेवानिवृत्त फिल्ड ऑफिसर, डॉ. एल. टी. खोब्रागडे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी, गायकवाड साहेब सेवानिवृत्त टेक्निशियन, गेडाम साहेब सेवानिवृत्त ग्राम विस्तार अधिकारी, मनीराम रामटेके सेवानिवृत्त परिचर प्राथमिक आरोग्य केंद्र देलनवाडी, अरुण जानुजी मेश्राम सेवानिवृत्त परिचर शासकीय आश्रम शाळा, या मान्यवरांचा सेवानिवृत्ती पर सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाप्रसंगी भीमजी राजभर साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की , समता मुलक समाज निर्माण करण्यासाठी व देशाला प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी, बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी , सर्व पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी समाजातील तळागाळातील लोकांसोबत संपर्क साधून संघटन मजबूत करून बहुजन समाज पार्टीला मजबूत करावे व व बहुजन समाजाने सत्ता हस्तगत करून आपला सर्वांगीण विकास करून घ्यावा. असे आवाहन केले.

तसेच सत्कारमूर्ती भीमराज पात्रीकर यांनी सत्कार कार्यप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तन-मन-धनाने सहकार्य करून संघटन मजबूत करावे असे मार्गदर्शन केले. 

 कार्यक्रमाचे संचालन  राजेश लिंगायत तर प्रस्ताविक  कृपानंद सोनटक्के आरमोरी विधानसभा अध्यक्ष बसपा यांनी केले . तर आभार शंकर बोरकुट जिल्हाध्यक्ष बसपा यांनी केले.

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बसपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.