आपत्ती विषयक मॉक ड्रिल दरम्यान आमदार डॉ.देवराव होळी यांची उपस्थिती…

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

गडचिरोली, दि.०९ : राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल ५ क्रमांकाची तुकडी पुणे यांचे नागपूर येथील पथकाद्वारे गडचिरोली जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन जनजागृती तसेच पूरामध्ये बचाव कार्याचे प्रात्यक्षिक करण्याकरीता सुरू आहेत. 

      सदर प्रशिक्षणा अंतर्गत बोटं चालविण्याचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम वैनगंगा नदीवरील कोटगल बॅरेज येथे पार पाडण्यात आला.

     सदर कार्यक्रमाला आमदार डाँ.देवराव होळी यांनी उपस्थिती दर्शविली व मॉक ड्रिल मध्ये सहभाग घेतला तसेच बचाव पथक तसेच बचाव साहित्य याबाबत माहिती जाणून घेतली.

      आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे,एनडीआरएफ पथक प्रमुख इन्स्पेक्टर प्रदीप, डॉ. उमेश सिडाम तसेच विविध शासकीय अधिकारी/कर्मचारी/आपदा मित्र उपस्थित होते.