संतभुमी अलंकापुरीत अवतारली वारकरी भक्तांची मांदियाळी…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त संतभुमी अलंकापुरीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी भक्तांची मांदियाळी अवतरली असून संपूर्ण आळंदी आणि परिसर वारकरीमय झाल्याचे दिसून येत आहे.

      पालखी सोहळ्यात सहभागी दिंड्यांचे आगमन झाले असून दिंडी मुक्कामाच्या ठिकाणी हरी नामाचा गजर सुरू झाला आहे, देहू फटा, प्रदक्षिणा रोड, इंद्रायणी नदी घाट, गोपाळपूर तसेच आळंदी आणि परिसरात वारकऱ्यांची मांदियाळी बघायला मिळत आहे.

     उद्या संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा असुन आळंदीत आलेले असंख्य भाविक देहू कडे प्रस्थान करत आहेत, देहूचे प्रस्थान सोहळा पार पाडून रविवार दि.११ रोजी माऊलींच्या प्रस्थान सोहळा बघण्यासाठी आळंदीत वारकरी येणार आहे.

      पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांसाठी आळंदी नगरपरिषद, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, वाहतूक विभाच, महावितरण विभाग सज्ज झाला असून वारकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेतली जात आहे.