गडचिरोली पोलीस दलातील मृत जवानांच्या कुटूंबियांना अॅक्सिस बँकेने दिला मदतीचा हात… — गडचिरोली पोलीस अधीक्षक यांचे हस्ते १० लाख रुपयाचा धनादेश कुटुंबियांच्या स्वाधीन….

 

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

             बँक म्हणजे ग्राहकांचे पैसे सांभाळणारी किंवा त्यांना कर्ज देणारी यंत्रणा अशी नागरीकांमध्ये ओळख असुन एक पाऊल पुढे जात आपल्या खातेधारकांच्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्यांच्या कुटुंबियांना आर्थीक आधार देण्याचा नवा आदर्श अॅक्सिस बँकेने ठेवला आहे. दिनांक २५ ऑक्टोंबर २०२२ रोजी गडचिरोली पोलीस दलातील कार्यरत कर्मचारी रविंद्र तुलाराम मडावी यांचे दिर्घ आजाराने निधन झाले होते.. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर मोठे संकट कोसळले. ही समस्या ओळखुन अॅक्सिस बँकेने मदतीचा हात पुढे करीत त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती निलम रविंद्र मडावी व आई नामे सौ. धुरपता तुलाराम मडावी यांना आर्थीक मदत स्वरुपात पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांचे हस्ते १० लाख रुपयाचा धनादेश अदा करण्यात आला.

         यावेळी  पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. तसेच अॅक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक, श्री. राकेश राजेंद्र बल्लालवार यांचे उपस्थितीत मृत कर्मचा-यांच्या कुटुंबियांना धनादेश स्वाधीन करण्यात आला.