Home Social चिमूरचा राहुल राजेंद्र मेहरकुरे जिद्द, चिकाटीने बनला पोलीस…  — श्री संत...

चिमूरचा राहुल राजेंद्र मेहरकुरे जिद्द, चिकाटीने बनला पोलीस…  — श्री संत संताजी जगनाडे महाराज तेली समाज कल्याणकारी मंडळ चिमुर व तेली समाज बांधवानी केला सत्कार….

     रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

           चिमूर शहरातील नेहरू वार्ड हजारे मोहल्ला येथील रहिवाशी राजेंद्र नामदेवराव मेहरकुरे व्यवसायाने शेतकरी यांचा मोठा मुलगा राहुल मागील अनेक वर्षापासून शहिद वाचनालय चिमुर येथे नियमित पणे स्पर्धा परिक्षेची तयारी अभ्यासिका करीत होता.

         शारिरिक कौशल्य व संदृढतेकरीता चिमुर तालुका क्रीडा संकुल मैदानावर जिकंण्याच्या जिद्दीने नियमित सराव करायचा त्याच्या अथक परिश्रमाला मोठे यश आले असून त्याची महाराष्ट्र पोलीस पदी नियुक्ती झाल्याने श्री संत संताजी जगनाडे महाराज तेली समाज कल्याणकारी मंडळ चिमुर व तेली समाज बांधवांतर्फे त्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ,शाल,मोमेंन्टो देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.

            तेली समाजाचा अभिमान राखल्याबद्दल त्याचे सन्मानपूर्वक कौतुक करण्यात आले, तेली समाज बांधवांनी राहुलला पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

           याप्रसंगी श्री संत संताजी जगनाडे महाराज तेली समाज कल्याणकारी मंडळाचे उपाध्यक्ष भाष्कर बावणकर,ॲड धनराज वंजारी सहसचिव ईश्वर डुकरे, प्रविणभाऊ सातपुते,बालु ऊर्फ श्रीरंग पिसे, किशोर पिसे ,संजू कामडी पप्पु धोपटे सदस्यासह वडील राजेंद्र मेहरकुरे ,काका विक्की मेहरकुरे, भाऊ प्रशांत मेहरकुरे , नरेश हजारे , प्रशांत तळवेकर सदस्य नगरपरिषद , अशोक तळवेकर , प्रणित सातपुते , रमेश बानकर , महेश हजारे , केशव हजारे सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते.