माजी ग्रामपंचायत सदस्य सलीम बाघाडे यांनी,”माॅ फातिमा,घरकुल योजना लागू करण्याची केली मागणी. — अल्पसंख्याक समाजासाठी घरकुल योजनेच्या धर्तीवर,”माॅ फातिमा,हवीय घरकुल योजना..

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी‌..

पारशिवनी ::- “देशामध्ये सबका साथ सबका विकास,नारा देत सर्वासाठी घरे व योजनेची व्याप्ती वाढवीत वेगवेगळ्या घटकासाठी सामाजिक,आर्थिक,भूमिहीन भटक्या जमाती यासाठी अनेक योजना अंमलात आणून पात्र घटकांसाठी निवारा योजना तयार करून त्याचा लाभ देण्यात येत आहे. 

         तसेच मुस्लीम समाजाला विकासाच्या प्रवाहामध्ये सहभागी करून घेण्यासाठी शासनाने इतर योजनेच्या धर्तीवर,”मुस्लीम समाजासाठी केंद्र व राज्याच्या निधीतून मुस्लीम समाजाच्या प्रथम शिक्षिका,”मॉ.फातिमा, यांच्या नावाने मुस्लीम समाजासाठी आवास योजना लागू करून मुस्लीम समाजाला हक्काचा निवारा योजना सुरु करावे यासाठी पारशिवनी येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य सलीम बाघाडे यांनी मागणी केली आहे.

        अल्पसंख्यांक समाजासाठी घरकुल योजनेच्या धर्तीवर,”माॅ फातिमा,घरकुल योजना लागू करण्याची मागणी केली आहे.मुस्लीम समाजाची शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून ते झोपडपट्टी वसाहतीमध्ये राहतात.

        यामुळे त्यांना निवाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी,”माॅ फातिमा,घरकुल योजना राबविण्यात आली पाहिजे.

         मुस्लिम समाजातील अनेक कुटुंब सर्वसाधारण घटकात मोडत असल्यामुळे यांना निवाऱ्याच्या हक्कापासून व विकासाच्या प्रवाहातून दूर ठेवले जात असल्याने नाममात्र कुटुंबांना लाभ मिळत असल्याचे दिसून आले आहे.

         अनेक कुटुंब आजही लाभापासून वंचित आहेत,त्यांना हक्काचा निवारा प्राप्त झाला नाही,हि विदारक परिस्थिती असतांना केंद्र व राज्य शासन अनेक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून अनुसूचित जमातीकरिता,”सबरी आवास, “कोलाम वस्ती विकास योजना,”अनुसूचित जाती करिता रमाई आवास योजना,”विमुक्त भटक्या जमातीकरिता यशवंतराव चव्हाण सामुहिक निवारा योजना, इतर मागासवर्गीय कुटुंबांसाठी मोदी आवास योजना,राज्यात राबविल्या जात आहेत.

         यामुळे,”माॅ फातिमा, अल्पसंख्यांक मुस्लीम समाजासाठी स्वतंत्र आवास योजना,”शहरी व ग्रामीण भागासाठी,लागू करण्याची मागणी गेल्या १०-१५ वर्षापासून होत आहे. 

       मात्र शासनाकडून न्या. सच्चर समिती,डॉ.महेमूदूर रहेमान समिती अहवालात अल्पसंख्यांक मुस्लीम समाजात सोयी-सुविधा निवारा शैक्षणिक, सामाजिक,आर्थिक क्षेत्रात पिछाडीवर व दैनिय अवस्थेचा अहवाल सादर करूनही मुस्लीम समाजाला विकासाच्या प्रवाहामध्ये आणल्या जात नाही. 

     मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,अल्पसंख्याक कल्याणमंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदनाद्वारे मुस्लीम समाजाला हक्काचा निवारा देवून अन्याय दूर करावा अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य सलीम बाघाडे यांनी केली आहे.