ईव्हीएम मशीनच्या विरोधात भारत मुक्ती मोर्चाचे १० जानेवारीला देशभरात धरना आंदोलन.. — ५६७ जिल्हाधिकारी कार्यालयावर धरना आंदोलन.. — देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी व हक्कासाठी आरपारची कायदेशीर लढाई.. — अन्यथा ईव्हीएम मशीन फोडल्या जातील..

प्रदीप रामटेके

 मुख्य संपादक

         ईव्हीएम मशीन व व्हीव्हिपॅट मशीन म्हणजे लोकशाही मुल्यांना पायदळी तुडविणारे हत्यार आहे.हे हत्यार या देशातील समस्त नागरिकांना सर्व हक्का पासून वंचित करीत आहे व बेदखल करीत आहे.तद्वतच ईव्हीएम मशीन व व्हीव्हिपॅट मशीन हे हत्यार या देशातील नागरिकांवर अत्याचार-अन्याय करणारे व शोषण करणारे ठरले आहे.

             यामुळे २०२४ ला होणारी लोकसभा निवडणुक ही मतपत्रिका द्वारा व्हावी यासाठी देशभरात आंदोलनाला सुरुवात झाली आहे.येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतपत्रिकांचा उपयोग केला गेला नाही तर प्रत्येक मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन फोडल्या जाईल असा इशारा भारत मुक्ती मोर्चा द्वारा यापूर्वी देण्यात आला आहे. 

          भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी संघटनेच्या माध्यमातून ईव्हीएम मशीन हटाव आंदोलन देशभरात केले आहे.याच अनुषंगाने ईव्हीएम मशीन व व्हीव्हिपॅट मशीन हटावचा दुसरा टप्पा १० जानेवारी २०२४ रोज बुधवारला पार पडणार आहे.

              १० जानेवारी २०२४ रोज बुधवारला भारत देशातील ५६७ जिल्हा कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन ईव्हीएम मशीन व व्हीव्हिपॅट मशीन का म्हणून नाकारायची?या संबंधाने कायदेशीर व मुलभूत अधिकारांतर्गत इत्यंभूत माहिती भारत मुक्ती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून दिली जाणार आहे व यानंतर देशातील ५६७ जिल्हाधिकाऱ्यांना ईव्हीएम मशीन व व्हीव्हिपॅट मशीन विरोधात निवेदने दिली जाणार आहेत.

            धरणे आंदोलनाला १२ वाजता सुरुवात होणार असून या धरणा आंदोलनात देशातील सर्व जाणकार व इतर नागरिकांनी सहभागी व्हावे आणि ईव्हीएम मशीन व व्हीव्हिपॅट मशीन विरोधातील धरणे आंदोलनाला समर्थन करावे अशा प्रकारचे आव्हान भारत मुक्ती मोर्चा द्वारा करण्यात आले आहे.