ओबीसी जागर यात्रेने भंडारा शहर दुमदुमले… — जागर यात्रेचे ठिकठिकाणी जल्लोशात स्वागत…. — भाजप सरकार ओबीसींच्या सदैव पाठीशी :- आशिष देशमुख…

प्रितम जनबंधु

  संपादक 

           भंडारा:- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ओबीसी बांधवांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांच्या संदर्भात माहिती व्हावी आणि ओबीसींच्या बाबतीत आरक्षणाच्या विषयाला घेऊन पसरविला जाणाऱ्या भ्रमाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या ओबीसी जागर यात्रेचे भंडारा जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात आले. तुमसर आणि भंडारा येथे झालेल्या जाहीर सभेच्या माध्यमातून आशिष देशमुख यांनी ओबीसी समाजाने संभ्रमित करणाऱ्यांपासून सावध राहावे असे आवाहन केले. भाजप सरकार सदैव ओबीसींच्या पाठीशी असल्याचे आशिष देशमुख यांनी यावेळी सांगितले.

            वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथून निघालेली ओबीसी जागर यात्रा माजी आमदार आणि महाराष्ट्राचे ओबीसींचे प्रभारी आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात तुमसर येथून भंडारा जिल्ह्यात दाखल झाली. सहा ऑक्टोबर रोजी गोंदिया जिल्ह्यातून भंडाऱ्यात दाखल झाल्यानंतर तुमसर येथे यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शहरातून रॅली काढण्यात आल्यानंतर संध्याकाळी जाहीर सभा घेतली गेली. रात्री ही यात्रा भंडारा जिल्ह्यात दाखल झाली. आज सकाळी शहरातील तुळजाभवानी माता मंदिरा परिसरातून बाईक रॅली काढण्यात आली. 

             यावेळी या रॅलीत खासदार सुनील मेंढे, माजी आ.आशिष देशमुख, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते, महामंत्री अर्चनाताई डेहनकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे, संपर्क प्रमुख रविंद्र चव्हाण, प्रदेश सचिव महेंद्र निंबार्ते, यांच्यासह इतर नेते सहभागी झाले होते. 

             खांबतलाव, शास्त्री, गांधी, पोस्ट ऑफिस, जिल्हा परिषद चौक असा प्रवास करून गणेशपुर येथे पोहोचली. गणेशपुर येथील चौकात रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी यात्रेत सहभागी झालेल्या भाजपा नेत्यांनी जागर यात्रेची पार्श्वभूमी विशद केली. केंद्रातील आणि राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ओबीसी समाज बांधवांसाठी राबविलेल्या अनेक कल्याणकारी योजना सांगताना ओबीसींच्या हिताचा सर्वाधिक विचार भाजपने केला असल्याचे सांगितले. 

            कित्येक वर्ष राज्य करूनही काँग्रेसला जे शक्य झाले नाही, ते भाजपला करता आल्याने अनेक विरोधकात ओबीसी समाजामध्ये सरकार विरोधात भ्रम पसरविण्याचे काम करीत आहे. आरक्षण असो वा अन्य योजनांच्या बाबतीत सरकार ओबीसींच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.  

            रॅली मध्ये भंडारा शहर आणि तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपर्क ते समर्थन अभियानाच्या पार्श्वभूमीवर स्वामीनारायण मंदिर येथे माळी समाजाची बैठक घेण्यात आली.    

            त्यानंतर ही यात्रा मोहाडी तालुक्यातील मुंढरी येथे दाखल होत त्या ठिकाणीही संपर्क ते समर्थन अभियान राबविण्यात आले. मुंढरी येथे कुंभार समाजाची बैठक घेण्यात आली. यानंतर यात्रा नागपूर जिल्ह्यात प्रवेश प्रवेश करीत मौदा कडे रवाना झाली. 

          यावेळी प्रामुख्याने ओबीसी मोर्चाचे पुर्व विदर्भ संघटक रविंद्र येणूरकर, प्रकाश बगमारे, चामेश्वर गाणे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत भुसारी, चैतन्य उमाळकर, आशु गोंडाने, विनोद बांते, प्रशांत खोब्रागडे, संजय कुंभलकर, अनुप ढोके, महेंद्र निंबार्ते, संतोष त्रिवेदी, आबिद सिद्दिकी, रुबी चड्डा, सचिन कुंभलकर, निशिकांत ईलमे, तुषार काळबांडे, सूर्यकांत ईलमे, गोवर्धन साकुरे, मयुर बिसेन, मनोज बोरकर, कैलास ताडेकर, प्रशांत निंबोळकर, सुखदेव वंजारी, रौनक उजवणे, साधना त्रिवेदी, माला बगमारे, चंद्रकला भोपे, गीता सिडाम, मधुरा मदनकर, आशा उईके, रोशनी पडोळे, माधुरी तूमाने, सौ घोलपे, वर्षा साकुरे, विनाताई भोंगाडे, चंद्रशेखर खराबे, चितेश मेहर, अर्चना श्रीवास्तव, बंटी ताडेकर, प्रशांत पुरुषार्थी, सुशील पडोळे, यश ठाकरे, तुषार हट्टेवार, अभिषेक राऊत, अक्षय गिरडकर, वेदांत निंबार्ते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.