विद्यानगर सार्वजनिक महिला मंडळ यांच्या तर्फे ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे फळ वाटप… 

 भाविक करमनकर 

तालुका प्रतिनिधी धानोरा 

8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो त्या दिनानिमित्त धानोरा येथील विद्यानगर वार्ड क्रमांक 1 च्या विद्यानगर सार्वजनिक महिला मंडळ यांनी ग्रामीण रुग्णालय धानोरा येथील डॉ. पल्लवी मडावी मॅडम यांच्या उपस्थितीत विद्यानगर सार्वजनिक महिला मंडळ यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

       यानंतर नगरसेविका वैशाली धाईत यांनी महिलांना महिला दिनानिमित्त मार्गदर्शन केले. तसेच नगरसेविका अलकाताई मशाखेत्री यांनी सुद्धा महिलांना मार्गदर्शन करून महिला दिनाचे महत्व सांगितले.

        यावेळी नगरसेविका सौ. वैशाली धाईत नगरसेविका अलकाताई मशाखेत्री, वाघाडेताई, गीताताई भोंडे, गंधाटे काकु, वनिता शेंडे, मने ताई,स्वाती ताई पुराम व विद्यानगर वार्डातील महिला उपस्थित होत्या.