आळंदीत महीला दिनानिमित्त आरोग्य क्षेत्रातील महिलांचा सन्मान…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्याबरोबरच समाजातील ओळख अधोरेखित करण्यासाठी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात आळंदी येथील ग्रामीण रुग्णालय येथे साजरा करण्यात आला.

            महिला प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. महिलांच्या या कार्याला सलाम करण्यासाठी व महिलांच्या कार्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आळंदी सेवा धाम व शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण यांच्या संकल्पनेतून आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

             या कार्यक्रमाला आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ.उर्मिला शिंदे, शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण, संकेत वाघमारे, अर्जुन मेदनकर तसेच ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर आणि राजमाता जिजाऊ महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यी बहुसंख्येने उपस्थित होते.

          यावेळी आळंदी व परिसरात पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या महिलांचा सुध्दा यावेळी मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.