समता सैनिक दल दिक्षाभूमीची शाखा थुगाव मध्ये स्थापन…

युवराज डोंगरे

  उपसंपादक

खल्लार :-

‘गाव तेथे शाखा घर तेथे सैनिक’ या अभियानाअंतर्गत थुगाव येथे समता सैनिक दल दिक्षाभूमी नागपूर च्या शाखेची स्थापना व नामफलकाचे नुकतेच उद्घाटन जिल्हा उपप्रमुख लताताई रमेश पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

            कार्यक्रमाकरिता प्रामुख्याने भंते धम्मसागर, जिल्हा अमरावतीच्या उपप्रमुख लताताई रमेश पाटील, रामेश्वर मोखळे पोलीस पाटील, हंसराज सोनोने, रमेश पाटील, रामेश्वर गडलिंग प्रामुख्याने उपस्थित होते.

 यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.    

          सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आल्यानंतर गावामधुन अभिवादन मार्च काढण्यात आला. सैनिकांनी तिन वेळा जय भीम सलामी दिल्या नंतर भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून त्यानंतर समता सैनिक दल दिक्षाभूमी नागपूर शाखा थुगाव च्या कार्यकारणीची व स्थापनेची घोषणा करण्यात आली. 

           या प्रसंगी दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे सदस्य हंसराज सोनोने यांनी सर्व सैनिकांना दलाची प्रतिज्ञा दिली.

             कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रमेश पाटील, रामेश्वर मोखळे, लता रमेश पाटील, स्मिता गोले, छाया मोखळे, सविता मोखळे, सारीका गोले, कल्पना मोखळे, निता मोखळे, सारीका मोखळे, लता मोखळे, प्रिती मोखळे, लता मेश्राम, रुष्मिता मोखळे, शितल मोखळे, वंदना मोखळे, उज्वला गोले, वैशाली श्रीरामे, संगीता मोखळे, प्रियाताई मोखळे , समिता नितनवरे, शालुताई मोखळे, निर्मला मोखळे, बबिता मोखळे, भारती मोखळे, संगीता सि. मोखळे, सोनु मोखळे, वनिता मोखळे, सुशिला मोखळे, वर्षा मोखळे, मंदा मधुकर ढवळे, सिंधु ढवळे, विमल बोरकर, वर्षा तंबाखे, कविता तांबोळे, कविता हरणे, सुष्मा जितेंद्र सरदार, कमल खंडारे, अलका मेश्राम, रेखा मुरलिया, जयमाला डोंगरे, अष्टशिला पाटील, सविता दलाल, सुलोचना खडसे, आरुषी गडलिंग, आणि टेंभुर्णी, सातरगाव,भानखेडा खुर्द, वाकपुर दादापुर, खरबी, थुगाव येथील सैनिक व उपासक उपासिका समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.