Home देशविदेश ट्रेन रद्द,बसपा पदाधिकारी व कार्यकर्ते निघाले लखनऊला पायदळ!..

ट्रेन रद्द,बसपा पदाधिकारी व कार्यकर्ते निघाले लखनऊला पायदळ!..

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक

      ९ आक्टोबरला बसपा संस्थापक अध्यक्ष मान्यवर कांशीराम यांच्या स्मृतीदिनानिमित्त उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे मातोश्री रमाबाई आंबेडकर मैदानावर इतिहास महारॅली चे आयोजन बसपा तर्फे करण्यात आले असून या महारॅलीला उपस्थित राहण्यासाठी बसपा पदाधिकारी व कार्यकर्ते हे पायदळ लखनऊला निघाले असल्याचे वास्तव आहेत.

         मान्यवर कांशीराम यांच्या स्मृतीदिनानिमित्त होणाऱ्या महारॅलीत बसपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभाग घेऊ नये म्हणून अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती पुढे येत आहे.

          मान्यवर कांशीराम यांच्या स्मृतीदिनानिमित्त होणाऱ्या महारॅलीत सहभाग घेण्यासाठी बसपा पदाधिकारी व कार्यकर्ते पोहोचणार नाही याची खबरदारी उत्तर प्रदेश सरकारने आडमार्गाने घेतली असेल,परंतु बसपा पदाधिकारी व कार्यकर्ते हे स्वाभिमानी असल्याने ते मान्यवर कांशीराम यांच्या स्मृतीदिनानिमित्त होणाऱ्या महारॅलीत सहभाग घेण्यासाठी पायदळ,स्वतःच्या वाहनाने किंवा भाड्याच्या वाहनाने पोहोचणार एवढे नक्की आहे!

            बसपा पदाधिकारी व कार्यकर्ते हे कॅडरबेस असल्याने त्यांना मान्यवर कांशीराम यांच्या स्मृतीदिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही.

      बसपा सुप्रीमो सुश्री बहन मायावतींचा एक आवाज व आदेश देशातील करोडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी महत्वपूर्ण ठरतो आहे,हे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना माहिती असताना,लखनऊ ला जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करुन ते काहीही साध्य करु शकत नाही.

         उलट बसपा सुप्रीमो सुश्री बहन मायावतींचा एक आवाज पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी महत्वपूर्ण आहे.कारण बसपा पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना माहिती आहे बहनची त्यांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होवू देत नाही.

          २०२७ ला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार पाडायचे असे उत्तर प्रदेशच्या समस्त वंचित,पिडीत,शोषीत,अन्यायग्रस्त,अत्याचारग्रस्त नागरिकांनी ठरवले आहे.याचा धसका मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे.

           स्वत:चा जिव वाचवासाठी लोकसभेत रडणारे योगी आदित्यनाथ हे जातीयवादी व अन्याय-अत्याचार करणारे मुख्यमंत्री आहेत असे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे.जातीभेद करणाऱ्या पक्षाला आता जवळ करायचे नाही अशी महत्वाकांक्षा तेथील नागरिकांची आहे…

          यामुळेच धास्तावलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मान्यवर कांशीराम यांच्या स्मृतीदिनानिमित्त होणाऱ्या महारॅलीत बहुसंख्य नागरिकांनी सहभाग घेऊ नये याची खेळी सुरू केली आहे.

       मात्र,बसपा पदाधिकारी व कार्यकर्ते हे शिस्तबद्ध पद्धतीने कर्तव्य पार पाडत असल्याने त्यांच्यामुळे कुणाचेही नुकसान होत नाही.उलटपक्षी ते सर्वांचे हित जपतात ही सत्यता आहे.