सिंदेवाही पोलिसांची मोठी कार्यवाही सुगंधित तंबाखू सह लाखोचा माल जप्त…

जिल्हा प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी

दखल न्यूज़ भारत

        दिनांक 05/06/2023 रोजी सिंदेवाही पोलिस पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती वरून एक पांढऱ्या रंगाचे बोलेरो गाडी क्र MH 35 AR 8962 ची झड़ती केली असता बोलेरों गाडीत सुगंधित तम्बाखू, गुटखा व रोख रक्कम आढळून आली.

      गाड़ी चालक आरोपी आशपाक मुन्ना शेख वय 22 वर्ष रा गोंदिया याला अटक केली. असून सदर गाडीतील मालाची चौकशी केली असता गाडीमध्ये 30 चुंगळी व बॉक्समध्ये 178.75 Kg. सुगंधित तंबाखू किंमत 2,67,900/- रुपये चा माल मिळून आला.बोलेरो गाडी किंमत 8,00,000 रूपे व नगदी रक्कम 2,19,500 रुपये असा एकूण 12,87,400/- रुपये चा माल पोलिसांनी ताब्यात घेतला असून सदर माल कोणाचा आहे. असे विचारले असता रवी खटवणी रा गोंदिया असे सांगितले आरोपी फरार असून सिंदवाही पोलिस शोध घेत आहे.

       पुढील तपास थानेदार तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय सागर महल्ले करीत आहे.