शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
ज्येष्ठ साहित्यिक आणि गझलकार प्रा.सुनंदा गिरीश पाटील यांना शब्दवेल नारीशक्ती पुरस्कार २०२६ या पुरस्काराने दि.५ एप्रिल २०२६ रोजी पुणे येथे सन्मानीत करण्यात आले .हा पुरस्कार त्यांना त्यांच्या साहित्यिक कार्यासाठी प्राप्त झालेला आहे.”शाल – पुष्प – सन्मानपत्र – सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
गेली ५४/५५ वर्षांपासून त्या लेखन कार्य करीत आहेत.आजवर त्यांची पंधरा पुस्तके प्रकाशित झाली असून अनेक पुस्तके प्रकाशनाधीन आहेत.यात काव्यसंग्रह / २ कथासंग्रह / २ कादंबऱ्या / ३ गझलसंग्रह प्रकाशित आहेत.त्यांच्या अनेक पुस्तकांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत .
अनेक प्रातिनिधिक संग्रह / कार्यालयीन गृहपत्रिका / वृत्तपत्रे / मासिके यातही त्यांचे बरेच साहित्य प्रकाशित झाले आहे.
तरुण भारत / लोकमत / लोकसत्ता / नवराष्ट्र / पुण्यनगरी / देशोन्नती / मराठवाडा / जनमंगल अशा विविध ठिकाणी त्यांनी सदर लेखन केले आहे.आजही अनेक ठिकाणी सदर लेखन सुरु आहे.
त्यांना अनेक शासकीय पुरस्कारांसह राज्य – राष्ट्रीय – आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त झाले आहेत.यात कथा – लेख – कविता – गझल – घोषवाक्य – निबंध असे विविध प्रकार आहेत.मराठी सोबत त्या हिंदीतूनही लेखन करतात . त्यातही सुनंदाताई पुरस्कृत झाल्या आहेत.
मराठी गझलक्षेत्रात ” गझलनंदा ” या नावाने त्या ख्यातकीर्त असून सुरेश भट यांच्या शिष्या आहेत.सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.



