Home देशविदेश कृपया ही पोस्ट संपूर्ण वाचू नये आणि चुकून वाचलीच तर समजून घेऊ...

कृपया ही पोस्ट संपूर्ण वाचू नये आणि चुकून वाचलीच तर समजून घेऊ नये,आणि समजून घेतलीच तर दुर्लक्ष करावे…..

         अती चांगल्या देश हिताच्या कामामुळेच मोदी तिसऱ्यांदा देशाच्या जनतेचे लाडके प्रधानमंत्री बनले…

    आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा!

      “आमचा देश आणि महाराष्ट्र राज्याची जनता खूप सदविचारी,खूप गोड शब्दांची भुकेली.अशी जनता या जगात शोधूनही सापडणारी नाही.अशा जनतेला माझे त्रिवार वंदन…….

कारण…….

     गोध्रा हत्याकांडातील प्रमुख आरोपी ( कायद्याने नव्हे तर नैतिकतेने ) असलेला, आपल्या धूर्त गोड शब्दांतून भारतीय जनतेवर फासे फेकतो आणि त्या फासात भोळीभाबडी जनता अलगद फसते आणि देशाच्या सर्वोच्च प्रधानमंत्री पदावर हा जाऊन बसतो.

     त्यानंतर सोराबुद्दीनचा आणि जज लोयाचा खुनी एक तडीपार मागून येऊन देशाच्या गृहमंत्रीपदावर विराजमान होतो.

       संपूर्ण देशाची सत्ता आपल्या हातात घेतात.सत्ता टिकविण्यासाठी सर्व नितीचा अवलंब करतात.यामध्ये लोकशाहीतील सर्वच संविधानिक संस्था कायदेमंडळ ( लोकसभा / राज्यसभा / इतर राज्यांच्या विधानसभा / विधानपरिषद ), कार्यकारी मंडळ ( प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ, राज्यसरकारे ), न्यायमंडळ ( सर्वोच्च न्यायालय आणि सर्वच उच्चं न्यायालये ), पत्रकारिता ( अदृश्य चौथा आधारस्तंभ ), निवडणूक आयोग ( जो EVM ला पाहिजे त्या विशिष्ट पक्षाला पाहिजे तेवढ्या काळापर्यंत सत्तेवर बसवतो ), CAG ( Comptroller Auditor in General ) भारताचा महानियंत्रक अर्थात हिशोबनीस, RBI गव्हर्नर ( आपल्या सोईनुसार बसवला ), CBI ( Central Beuro Of Investigation अर्थात केंद्रीय तपास पथक ) ,सर्व महामंडळ प्रमुख , सर्व अभिजात विद्यापीठे ( सार्वजनिक आणि खाजगी ) , इत्यादी या सर्वांचे रिमोट आपल्या हातात घेतले.

    त्यानंतर प्रथम विरोधी राष्ट्रीय पक्षाला संपविण्याचा विडा उचलतात.

       त्यानंतर त्यांच्या सोबत असणाऱ्या छोट्या – मोठ्या मित्रपक्षांची पंख छाटल्या जातात.त्यानंतर प्रमुख प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांना हतबल करून आपल्या गोदमध्ये घेऊन गोदी मीडिया बनवल्या गेले.

      जे यातून वाचले,ज्यांनी या मोदी / शहाच्या धमकीला भीक नाही घातली.त्यांना टार्गेट करून संपविण्यासाठी सर्वतोपारी प्रयत्न चालू आहेत.पण तरीसुद्धा ही निर्भीड आणि परखड सत्यवादी पिंड असलेले पत्रकार मात्र बिचाऱ्या जनतेची बाजू घेऊन खडकाप्रमाणे ठाम उभी आहे ( जरी त्यांना जनता साथ देत नसली तरी )….. 

      शेवटी येथील जनतेला EVM च्या मदतीने खोट्या लोकशाहीचे गुलाम बनवून हुकूमशाहितून RSS माध्यमातून..

     “मनुस्मृती,लादण्याचे मोठे षडयंत्र या देशात 2014 पासून चालू आहे. हे षडयंत्र विकसित करण्यास येथील भारतीय जनतेचा मोठा सिंहाचा वाटा आहे. म्हणून भारतीय जनतेला त्रिवार वंदन….

       हे असं चालू देणं हीच आमची (भारतीय जनतेची ) हतबलता आहे!

     नव्हे आम्हाला गुलामीची सवयच झाली. म्हणून…..

        केवळ 75 वर्षांपूर्वी सर्वप्रकारच्या स्वातंत्र्याचं आम्हाला एक स्वप्न पडलं होतं. त्यात एका महापुरुषाने आम्हाला संविधानातून एका संसदीय लोकशाहिची गोष्ट सांगितली. गोष्ट फार चांगली होती,मजेशीर आणि गमतीदार पण होती.आम्ही मन लावून ती ऐकली,आणि झोपी गेलो.जेंव्हा स्वप्नातून जागे झालो.तेंव्हा 2025 साल उजाडलं.म्हणून आम्ही 75 वर्षांपूर्वीच्या गुलामीत पुन्हा एकदा आलो.आणि आता फरक एवढाच आहे की तेंव्हा इंग्रज होते. आता आमच्या घरातलेच मोदी – शहा आहेत!

     गुलामांना हक्क नसतात केवळ कर्तव्यच असतात.म्हणून आम्ही या देशात आणि राज्यात या व्यवस्थेने लादलेल्या परिस्थिती विरुद्ध एक शब्दही बोलायचं नाही.बोलणाऱ्याची जीभ कापली जाईल. उठाव किंवा बंड करायचे नाही.जेलमध्ये टाकल्या जाईल.

       आहे त्या परिस्थितीत कामगारांने,सर्वसामान्य जनतेने, मध्यमवर्गीयाने,महीलांनी, जगता- जगता मरावे आणि मरता – मरता जगावे, किंवा पटत नसेल तर आत्महत्या करून स्वतःची सुटका करून घ्यावी. अशी अवस्था आज निर्माण केल्या गेली आहे.ती केवळ आणि केवळ या जोडीकडून!

      ” शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.ते जो कुणी प्राशन करिन. तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.”

—-डॉ. बाबासाहेब आंबेडकर

       मी ( अनंत भवरे ) जरा अज्ञानी आहे.आपल्या देशात आणि विशेषतः आंबेडकरी समाजात खूप शिकलेले आणि अनेक पदव्या मिळविलेले आहेत.बाबासाहेबांसारखे किंबहुना त्यांच्यापेक्षाही कडक सुटाबुटात त्या कोटाला विद्वता न झेपावणारी विद्वान मंडळी आहेत.त्यांना माझा प्रश्न आहे की,वरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दातील वाघिणीच्या दुधाचा अर्थ काय तो जरा समजून सांगावा….

      आमचा अल्पसंख्यांक समाज ( बौद्ध, मुस्लिम,शीख, इसाई इत्यादी ) हा या मोदी – शहाच्या / मोहन भागवताच्या /RSS / भाजपच्या अलगद गळाला लागून आपले सर्व हक्क गमावून बसला आहे.

        शिका,संघठीत व्हा आणि संघर्ष करा हा नारा बाबासाहेबानी कुणासाठी दिला होता?

     ते तरी आम्हाला कडक सुटाबुटातल्या विद्वानांनो आम्हाला कळूद्या….

      कारण आम्ही अज्ञानी आहोत हो….

      आम्हाला ही भीमक्रांती, संविधानक्रांती समजत नाही हो. काही बोटावर मोजणारे अनंत भवरेसारखे जे अठराविश्व् दारिद्र्यात खितपत पडून असलेले संविधान……संविधान…….संविधान…..करत बोंबलत सूटतात!

        परंतु ,” त्या ” महामानवाच्या हृदयातील “संविधानक्रांती ” जी केवळ आपल्या देशालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला / मानवतेला तारणारी आहे,असं म्हणतात. असे असेल तर मग आमचा देशातच अशी परिस्थिती अवघ्या 75 वर्षाच्या स्वप्नाचा चक्काचूर का होतो?

    हे कोणी विद्वान आम्हाला समजून सांगेल का?

      का त्यासाठी आम्हाला अवतारी पुरुषाची वाट पाहावी लागेल!

        तसे असेल तर मग आम्ही आता केवळ बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर,फोटोसमोर,स्मारकात जाऊन पुतळ्या समोर बसून, विपश्यनेच्या माध्यमातून विहारात जाऊन बुद्धाच्या मूर्तीसमोर बसून या सर्व प्रश्नांच्या उकलतेसाठी जप करत बसायचं का?

      आम्ही असंच जगावं आणि राहावं यासाठीच तर हे RSS वाले मनुवादी विहारातील, पुतळ्यासाठी,स्मारकासाठी सरकारी तिजोरीतील पैसा वारेमाप उधळत आहेत.ते यासाठीच तर नव्हे!

        तसेच असेल,आणि हे जर असच घडत असेल,तर मग या देशातील सर्वच महापुरुषानी या देशाला स्वतंत्र करून कायमची गुलामी पुसली. ती काय पुन्हा ही मनुस्मृतीची गुलामी अलगद आणण्यासाठी?

        हा प्रश्न येथील सर्वच कडक सुटाबुटातल्या विद्वानांना एका अशिक्षित अनंत भवरेकडून सर्वसामान्य जनतेच्या प्रातिनिधिक स्वरूपातून आहे.

कृपया या प्रश्नांचाही अर्थ समजून सांगावा…… 

कारण…..

       सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती म्हणतात,”या देशाला एका फ्रेंच राज्यक्रांतीची आवश्यकता आहे.”

        “आमचा देश कोणत्या गंभीर वास्तव आणि भयानक परिस्थितीतुन जात आहे.हे आपण कल्पनाही करू शकणार नाही.जे दूरदृष्टीने विचार करतात तेच उपाय शोधून कार्य करत वाटचाल करत असतात. त्यांना समाज साथ देवो अथवा ना देवो.ते त्यांचे कार्य निरंतर चालू ठेवतच असतात.कारण त्यांना त्यांच्यावर असलेलं महापुरुषांचं ऋण फेडायचं असतं म्हणून…..

       आजपर्यंत आम्ही उद्याच्या आशेवर जगत आलो होतो. आता तर ती ही संपली. आता आजची आणि संध्याकाळची शास्वती राहिलेली नाही.”

        अशा गंभीर परिस्थितीत सुद्धा “संविधानच” तारणार आहे. त्यातील शक्ती समजून घ्यायची असेल तर आम्हाला आमच्या हृदयाच्या डोळ्यावर लावलेला जाती- धर्माचा आंधळ्या श्रद्धेच्या कोरड्या अहंकारातून आलेला चष्मा काढून मानवतेचा पारदर्शक चष्मा चढवावा लागेल.

           आवाहनकर्ता..

            अनंत केरबाजी भवरे