लोड शेडिंग वाढली शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले, रब्बी हंगाम संकटात…  — संतप्त शेतकरी रास्ता रोको आंदोलन करणार..

कूरखेडा तालुका प्रतिनिधि 

            तळेगांव‌ व अंतरगाव परीसरातील लोड शेडिंग अचानक ४ तासावरून १२ तास करण्यात आल्याने शेतकऱ्यांचे नियोजन चूकत रब्बी धान पीक धोक्यात आले आहे. त्यामूळे संतप्त शेतकऱ्यांनी आज उपविभागीय अधिकारी कार्यालय कूरखेडा येथे धडक देत येथील विद्यूत पूरवठा पूर्ववत करण्यात न आल्यास दि ११ मार्च रोजी कूरखेडा-वडसा मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदन देत केला आहे. 

           तालूक्यातील तळेगांव फिडर वर व अंतरगाव सब स्टेशन अंतर्गत येनाऱ्या खेडेगांव,पुराडा‌ व रामगड फिडर वर यापूर्वी दिवसातून फक्त सकाळी २ तास व सांयकाळी २तास लोड शेडिंग करण्यात येत होती.या अनूषगांने नियोजन करीत या परीसरातील शेतकऱ्यांनी रब्बी धानाची लागवट केली.मात्र कोणतीही पूर्वसूचणा न देता दि.६ मार्च पासून येथील लोड शेडिंग ४ तास वरून १२ तास करण्यात आल्याने शेतकर्यांचे नियोजन कोलमडत रब्बी धान पीक धोक्यात आले आहे.

          त्यामूळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आज कांग्रेस पदाधिकऱ्यांस उपविभागीय अधिकारी कार्यालय व विद्यूत वितरण कंपनीचा उपविभागीय कार्यालयावर धडक देत निवेदन दिले व तात्काळ विद्यूत पूरवठा पूर्ववत करण्यात न आल्यास दि ११ मार्च रोजी कूरखेडा-वडसा मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला.

            यावेळी तालुका कांग्रेस अध्यक्ष जीवन नाट जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे माजी जि प सदस्य प्रभाकर तूलावी माजी प स सभापती गिरीधर तितराम शेतकरी परसराम हलामी, वासूदेव दरवडे,भुमेश्वर सोनवाने, ग्यानचंद सहारे व मोठ्या संख्येत शेतकरी हजर होते.