26 जानेवारी ला राजरत्न आंबेडकर घुग्घुस शहरामध्ये… — दोन दिवसीय चालणार प्रबोधनात्मक कार्यक्रम…

प्रेम गावंडे

उपसंपादक

दखल न्युज भारत

             घुग्घूस : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुंदर असे स्मारक घुग्घूस शहराच्या दर्शनी भागात निर्माण करण्यात आलेले आहे.

        या स्मारकात अष्टधातूंनी निर्माण करण्यात आलेली नऊ फूट उंच पायथ्यासह तेवीस फूट उंचीची सुबक व लक्षवेधक प्रेरणादायी पुतळा 26 जानेवारी 2023 रोजी भव्य अश्या कार्यक्रमात बसविण्यात आला होता.

        येत्या 26 जानेवारी रोजी बाबासाहेबांच्या पुतळ्यांच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त दोन दिवसीय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाची जय्यत तैयारी शुरु असून सदर कार्यक्रमा करिता शहरात बाबासाहेब आंबेदकारांचे वंशज राजरत्न आंबेडकर हे उपस्थित होणार आहेत.