सावलीचे ग्रामीण रुग्णालय आहे काय?  — वैद्यकीय अधीक्षक आणि डॉक्टरच नाही!  — रुग्णांची दररोज होतय गैरसोय..

     सुधाकर दुधे

तालुका प्रतिनिधी सावली

      सावली ग्रामीण रुग्णालयात लगतच्या अनेक गावांतून रुग्ण येत असतात.येथे एम.एस.डॉक्टरच उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.

        आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्याप्रती शासन गंभीर असले तरी प्रशासन मात्र उदासीन असल्याचे चित्र दिसून येत आहे.

       या रुग्णालयात लगतच्या सहा आरोग्य केंद्रातून रुग्ण येत असतात.येथे एम.एस.डॉक्टरच उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. सावली ग्रामीण रुग्णालयात 8 नोव्हेंबर 2023 रोजी वैद्यकीय अधिकारी डॉ.बंडू रामटेके यांना प्रभारी चार्ज देण्यात आला.

          रुग्णालयात भेट दिली असता एक महिन्यापासून प्रभारी अधिक्षक डॉक्टर बंडू रामटेके हे आले नाही अशी माहिती मिळाली.सध्याच्या स्थितीत डॉक्टर ऋषिकेश देशमुख व डॉक्टर प्राजक्ता पाटील भार वाहून नेत आहे.सहाय्यक अधीक्षक प्रशांत हेमके हे 3 वर्षापासून कार्यरत आहेत.

        दवाखान्याचा बराच भार कनिष्ठ लिपिक उषा खणके सांभाळतांना दिसून येतात.दवाखान्यातील परिसर अस्वच्छ दिसून येतो.पंखे मंद स्थितीत फिरत आहेत.पंख्याचे रेगुलेटर तुटलेले आहे.स्ट्रेचर रक्ताने भरून आहेत.

       ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक पद अजूनपर्यंत भरले गेलेले नाही. परिणामी,१५० ते २०० घरात असलेली बाह्यरुग्ण सेवा अर्ध्यावर आली आहे. 

        8 नोव्हेंबर 2023 पासून ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पूर्णवेळ नियुक्ती न केल्याने गोरगरीब रुग्णांचा कोणी वाली उरला नसल्याची स्थिती आहे.ग्रामीण रुग्णालयात दंत चिकित्सक नाही.मात्र,दंत चिकित्सा करण्यासाठी डॉक्टरांना खुर्ची आहे. 

         नेत्रचिकित्सक तज्ज्ञ पदही आहे.मात्र सोमवार व गुरुवारला हजर असतात.एकंदरीत ग्रामीण रुग्णालयाची स्थिती नाजूक आहे.सावली तालुक्यातील जनतेच्या भावना समजून जिल्हा शल्यचिकित्सकांनी या बाबतीत निर्णय तात्काळ निर्णय घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्याची (पूर्णवेळ ) नियुक्ती करावी,अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

       दवाखाने आहेत तज्ञ डॉक्टर नाही,त्यामुळे रुग्णाचे हाल होत आहेत.या संदर्भात प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. बंडू रामटेके यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.सद्यस्थितीत ग्रामीण रुग्णालयात नियमित वैद्यकीय अधिकारी नाहीत,ही वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी उद्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोळे यांनी बैठकीस चंद्रपूर येथे बोलावणे केले आहे.