Home Maharashtra चिमूर तालुक्यात अवैध धंदे दिसत नाही,”याचेच आश्चर्य!.. — पोलिसांच्या जबाबदारीचा पंचनामा…

चिमूर तालुक्यात अवैध धंदे दिसत नाही,”याचेच आश्चर्य!.. — पोलिसांच्या जबाबदारीचा पंचनामा…

 प्रदीप रामटेके

     मुख्य संपादक

        चिमूर तालुकातंर्गत मौजा शंकरपूर,जांभुळघाट,महालगाव,नेरी,मासळ,खडसंगी बिटात देशी विदेशी दारुचे आणि सट्ट्याचे सुरू असलेले अवैध धंदे आणि स्थानिक भिसी व चिमूर येथे सुरु असलेले जुगारांचे अड्डे,सट्टापट्टीचे ठिकाणे भिसी व चिमूर येथील पोलिस अधिकाऱ्यांना आणि पोलिस कर्मचाऱ्यांना दिसत नाही,”याचेच आश्चर्य!… 

              चिमूर-भिसी पोलिसांच्या बेजबाबदार कृती व कर्तव्यामुळे,”चिमूर पोलिस स्टेशन आणि भिसी पोलिस स्टेशन हद्दीत,”जागोजागी सुरू असणारे अवैध धंदे आणि वाढणारे अवैध धंदे,महीला-पुरुषांना,विद्यार्थ्यांना असुरक्षित करणारे आहेत,त्यांचे जिवन उध्दवस्त करणारे आहेत,त्यांचे वर्तमान व भविष्य बेचिराख करणारे आहेत…

           असे असताना दोन्ही पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी व पोलीसांनी अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांनी स्वत:च्या कर्तव्याचे व विश्वासर्हतेचे धिंडवडे काढणे होय.

         तद्वतच पोलिस विभाग स्वत:च्या निष्पक्षतेला आणि क्षमतेला विसरुन अवैध धंद्यांचे संरक्षण करण्यासाठी धडपडत असेल तर त्यांनी स्वत:च्या ब्रिद वाक्याचे आणि गोपनीयतेचे व शपथेचे दिवसातून दहा वेळा स्मरण केले पाहिजे.

             पोलिस विभागाच्या छत्रछायेखाली अवैध धंद्यांना प्रोत्साहन व चालना चिमूर तालुकातंर्गत मिळत असेल तर असे पोलिस विभाग कोणत्या कामाचे? हा प्रश्न महिला व पुरुषांना पडला आहे…

           पोलिस अधिकाऱ्यांच्या व पोलीस कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या या अवैध धंद्यांना आडा घालण्यासाठी,लोकांची सुरक्षा करण्यासाठी,शांतता कायम ठेवण्यासाठी,गुन्हेगारीला रोखण्यासाठी असतात.यामुळे त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध धंदे कसे काय सुरु असतात,हा प्रश्न त्यांनी स्वत:लाच विचारायला हवा.

          पोलिसांची मुख्य कर्तव्ये कायद्याची अंमलबजावणी करणे,सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखणे,गुन्हेगारी रोखणे,तपास करणे आणि नागरिकांच्या जिवाची व मालमत्तेची सुरक्षा करणे,गुन्हेगारांना पकडणे,गुन्ह्यांची नोंद करणे,पुरावे गोळा करणे,अशी आहेत.

            तद्वतच पोलिसांची प्रमुख कर्तव्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणे,सार्वजनिक ठिकाणी शांतता टिकवणे,गुन्हेगारी रोखणे आणि समाजविघातक कृत्ये थांबवणे हे सुद्धा आहेत.

           नागरिकांची सुरक्षा करणे,लोकांचे जीवन सुधारणे,त्यांच्या स्वातंत्र्याचे आणि मालमत्तेचे संरक्षण करणे असेही त्यांची कर्तव्य आहे.परंतु नागरिकांच्या हिताला व संरक्षणाला नाकारुन अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करणे हितपत योग्य आहे,याबाबत स्थानिक पोलीसांनी विचार करायला नको काय!…

            याचबरोबर गुप्तचर माहिती गोळा करणे,सार्वजनिक शांतता भंग करू शकणाऱ्या बाबींबद्दल माहिती गोळा करणे आणि प्रतिबंधात्मक कारवाई करणे हे पोलिसांचे आद्य कर्तव्य आहे.

          पोलीस हे जनतेच्या सेवेसाठी नियुक्त केलेले जनसेवक आहेत,जे संविधान आणि कायद्याशी निष्ठा बाळगून कार्य करतात अशी त्यांची ओळख आहे.म्हणूनच भिसी व चिमूर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी,चिमूर तालुक्यातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद केली पाहिजेत या मताची चिमूर तालुक्यातील जनता आहे… 

           पोलिस अधिकाऱ्यांच्या चार मुख्य जबाबदाऱ्या आहेत.यामध्ये कायद्याची अंमलबजावणी करणे आणि गुन्हेगारी रोखणे,यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

          पोलिसांचे प्रमुख कर्तव्य म्हणजे गुन्हेगारी आणि अव्यवस्था रोखणे आहे तर ते या दोन्ही बाबींकडे दुर्लक्ष का म्हणून करतात?हा प्रश्न पुढे येतो आहे.

       पोलिसिंगची महत्त्वपूर्ण तत्वे,१) निस्वार्थता,२) सचोटी,३) वस्तुनिष्ठता,४) जबाबदारी५) मोकळेपणा,५) प्रामाणिकपणा आणि योग्य नेतृत्व असे आहेत.. .

          पोलिसांसाठी जेव्हा नीतिमत्ता संहिता लिहिली गेली,तेव्हा त्यात आणखी दोन तत्वे जोडण्यात आली,ती म्हणजे निष्पक्ष वर्तणुक करणे व कर्तव्य पार पाडणे आणि सर्वांचा आदर करणे होय…

         पोलिसांनी नेहमीच सभ्य आणि चांगले वर्तन ठेवले पाहिजे,ते विश्वासार्ह आणि निष्पक्ष असले पाहिजेत,त्यांच्याकडे प्रतिष्ठा आणि धैर्य असले पाहिजे आणि त्यांनी लोकांचे चारित्र्य जपले पाहिजे आणि त्यांचा विश्वास जोपासला पाहिजे.

            सर्वोच्च दर्जाची सचोटी हा पोलिसांच्या प्रतिष्ठेचा मूलभूत आधार आहे.असे असताना पोलिस अधिकारी व कर्मचारी हे स्वत:च्या सर्वोच्च दर्जाची सचोटी विसरतात,याला काय म्हणावे?