Home Vidarbha ग्रामगीता महाविद्यालयात ‘माय भारत आउटरिच’ कार्यक्रमाचे आयोजन…

ग्रामगीता महाविद्यालयात ‘माय भारत आउटरिच’ कार्यक्रमाचे आयोजन…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

          केंद्र शासनाद्वारे माय ‘भारत पोर्टल’ लॉंच होऊन एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय आणि रा.से.यो. संचालनालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘माय भारत आउटरिच’ कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

          माय भारत पोर्टलची वैशिष्ट्ये आणि फायदे बद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करून या पोर्टलवर जास्तीत जास्त रा.से.यो स्वयंसेवकांची नोंदणी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

           महाविद्यालयाने ‘माय भारत ॲम्बेसेडर’ म्हणून निवडलेले रा.स.यो. स्वयंसेवक दिलराजसिंग अंधेरेले आणि वैभव बारेकर यांच्याद्वारे पीपीटी च्या सहाय्याने सादरीकरण करण्यात आले.

          हा उपक्रम ‘माय भारत पोर्टल’ द्वारे युवकांना विविध क्षेत्रात सहभाग, स्वयंसेवा आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून विविध संधीशी जोडून त्यांच्या विकास आणि सक्षमीकरणाला चालना देणारा एक व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.

          महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनंदा आस्वले यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. बिजनकुमार शील यांनी आवश्यक सहाय्य प्रदान करून कार्यक्रमाची व्यवस्था करून दिली. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने रा.से.यो स्वयंसेवक उपस्थित होते.