खल्लार ग्रा.पं. च्या सरपंचपदी आरिफ शहा यांची अविरोध निवड…

 

युवराज डोंगरे/खल्लार

      उपसंपादक

           खल्लार परिसरातील मोठया ग्रा पं पैकी असलेल्या खल्लार ग्रा पं च्या सरपंचपदी आरिफ शहा युनूस शहा यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. खल्लार, लांडी, मलकापूर या तिन गावामिळून खल्लार ग्रा पं असुन खल्लार ग्रा पं चे तत्कालीन सरपंच योगेश अरुण मोपारी यांनी राजीनामा दिल्यामुळे खल्लार येथील सरपंचपद रिक्त होते. सुरुवातपासूनच सरपंच पदाचे दावेदार असलेले आरिफ शहा युनूस शहा यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणे बाकी होते.

        आज ५ ऑक्टोबर येथील ग्रा पं च्या कार्यालयात सरपंचपदासाठी औपचारिक निवडणूक घेण्यात आली सरपंचपदासाठी आरिफ शहा युनूस शहा यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची सरपंचपदी अविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दर्यापूर पं स चे विस्तार अधिकारी मिलिंद ठुनकले, ग्रामविस्तार अधिकारी के एन घोंगडे, ग्रा पं कर्मचारी विनोद मोहोड, गजानन हिंगमीरे,इरफान शहा,खल्लार जि प माजी सदस्य सुनिल डिके,माजी सरपंच योगेश मोपारी,सौ पुजाताई खंडारे ,ग्रा पं सदस्य सलिम बेग, सौ रेखाताई खराडे, सौ मालताबाई राक्षसकर,सौ रजनीताई इंगळे, शाह हिना परवीन व गावकरी मंडळी उपस्थित होते.

       बॉक्स 

      –खल्लार ग्रा पं च्या इतिहासात पहिल्यांदाच मुस्लिम सरपंच

          खल्लार ग्रा पं स्थापन झाल्यापासून ते आतापर्यंत एकही मुस्लिम सरपंच झाला नाही. ग्रा पं स्थापनेपासून आता पहिल्यांदाच मुस्लिम समाजातील सरपंच झाला असून आरिफ शहा युनूस शहा यांची सरपंचपदी अविरोध निवड झाल्याने खल्लार ग्रा पं मध्ये मुस्लिम सरपंच होण्याचा मान मिळविला असून खल्लार ग्रा पं मध्ये एक इतिहास निर्माण झाला आहे.