पारशिवनी परिसरातील समस्या सोडविण्यासाठी प्रहार संघटना सक्रिय,तहसिलदारांना निवेदन.. — मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनचा इशारा..

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

         विविध विभागामार्फत विकासकामांना गती मिळावी,सोई सुविधा निर्माण करता याव्यात व त्यातून सर्व सामान्य जनतेला सुविधा निर्माण होईल,या दृष्टिने शासनाच्या तिजोरीतून मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो आहे.

           मात्र,अनेक शासकीय विभागामार्फत समस्या सोडविण्याच्या प्रयत्न होत नसल्याने सर्व सामान्य नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने अखेर प्रहार संघटनेच्या वतीने गुरुवार ४ जुलैला पारशिवनी नायब तहसिलदार रमेश पागोटे यांना निवेदन देऊन पारशिवनी परिसरातील समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली.

        सावनेर पारशिवनी – आमडी फाटा मार्गावरील लावण्यात आलेले स्ट्रीट लाईट दोन वर्षांपासून बंद असून ते तत्काळ सुरू करण्यात यावी,भूमी अभिलेख कार्यालयात शेती मोजणीचे अनेक प्रकरणे प्रलंबित असून ते निकाली काढण्यात यावी,शेतकऱ्यांचा प्राळीव प्राण्यांची वाघ शिकार करीत असल्यानें वाघाला तत्काळ पकडून जंगलात सोडविण्यात यावे,तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वनविभागा कडून तत्काळ भरपाई देण्यात यावी,पारशिवनी पंचायत समितीमार्फत २८ घरकुल बांधकामांची तसेच विहिर बांधकामाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी,शहरातील सांडपाण्याच्या साई करण्यात यावी,छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी,फुटपाथ दुकानदारांना दुकानाचे गाळे उपलब्ध करून देण्यात यावे यासह आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.

          ही समस्या येत्या आठ दिवसांत सोडविण्यात यावी अन्यथा प्रहार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा त्यावेळी शिष्टमंडळाने दिला.

          याप्रसंगी सालिम वाघाडे,मोहन लोहकरे,आकाश दिवटे,राजकुमार राऊत,जमील शेख,रफीक झाडिया,नामदेव वरेकर आदी उपस्थित होते.