मानव विकासची बस सेवा पर्यायी मार्गाने सूरू करा :- माजी आ.गेडाम…  — सतीनदीचा खचलेल्या रपट्याची केली पाहणी…

     राकेश चव्हाण 

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

       कूरखेडा मूख्यालयाला कोरची सह ग्रामीण भागाला जोडणारा सतीनदीचा रपटा आज गूरूवार रोजी पहिल्याच पावसात वाहून गेला या ठिकानी माजी आ.आनंदराव गेडाम यानी भेट देत पाहणी केली तसेच तिथे उपस्थीत तहसीलदार कूंभरे याना सदर मार्ग बंद झाल्याने विद्यार्थांचे शैक्षणिक नूकसान टाळण्याकरीता पर्यायी मार्गावर विद्यार्था करीता राबविण्यात येणारी मानव विकास मिशनची बस फेरी सूरू करण्याची सूचणा केली.

         ग्रामीण भागातून मोठ्या संख्येत विद्यार्थी तालूका मूख्यालयात असलेल्या शाळा महाविद्यालयात येतात मात्र सदर मार्ग बंद झाल्याने शाळा महाविद्यालयात पोहचणे त्याना कठीन होणार आहे. त्यांचे शैक्षणिक नूकसान टाळण्याकरीता दूर अंतरावरील असले तरी पर्यायी मार्गाची आवश्यक दूरूस्ती करीत या मार्गाने मानव विकास मिशनची बस सेवा सूरू करावी याकरीता तातडीने शिक्षण विभाग व एस टी महामंडळाची अधिकार्यांची बैठक घेत आवश्यक निर्देश द्यावे.

           पर्यायी मार्ग अधिकचा लांब अंतराचा असला तरी विद्यार्थाना जून्या अंतरावरील पासेस वरच ही सेवा उपलब्ध करून द्यावी अशी सूचणा सूद्धा यावेळी माजी आमदार आनंदराव गेडाम यानी तहसीलदार रमेश कूंभरे याना केली.

            तसेच यावेळी येथे उपस्थीत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे शाखा अभियंता स्वामी शंभू याना पूलाचा बांधकामात होणारी दिरंगाई बाबद जाब विचारत धारेवर धरले यावेळी त्यानी प्रशासनाचा बेजबाबदारपणा दूर्लक्ष तसेच दिरंगाईमूळेच बांधकाम रखडत तालूका वासीयाना तिन महिणे शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागणार आहे असा आरोप सूद्धा त्यानी यावेळी केला.

               याप्रसंगी कांग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र गजपूरे देसाईगंज तालुका अध्यक्ष राजू बूल्ले कांग्रेस आदिवासी आघाडीचे प्रदेश सचिव छगन शेडमाके, सामाजिक कार्यकर्ते तिमेश्वर कोरेटी मोहीत अत्रे नायब तहसीलदार राजकूमार धनबाते तसेच गावकरी हजर होते.