मुलींच्या जन्माच्या स्वागताने – बेटीयोंका सन्मानाने वृक्षाई तर्फे पर्यावरण दिन साजरा.. 

प्रेम गावंडे

उपसंपादक 

दखल न्युज भारत

                 5 जुन जागतिक पर्यावरण दिन हाच वृक्षाई चा स्थापना दिन व वृक्षाई ची प्रेरणा असलेल्या ट्री बॉय अजिंक्य कायरकरचा 27 व्या वाढदिवसा निमित्त नवजात मुलींच्या जन्माचे स्वागत करीत पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

        चंद्रपूर शासकीय रुग्णालय येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सर्व प्रथम निमंत्रित पाहुणे जेष्ठ सेवाव्रती गंगुबाई जोरगेवार (अम्मा), डॉ शुभांगी मत्ते, भारती जिराफे, सुनिता पाटील, गीता अत्रे, रेखा चांभारे, वर्षा कोल्हे-जवळे, मृणालिनी खाडिलकर, ज्योती शिवणकर, नगमा पठाण, शितल खोब्रागडे, नंदा हाटे, शिरीन कुरेशी, हेमा बहादे, रोशनी गुरनुले, ज्योती पऱ्हाटे, श्रावणी जिराफे, वंदना हातगावकर, गौरी मत्ते, सविता डंडारे, स्मिता चावडा, रुपाली कायरकर, राणी बोरा, पूजा खोबरे, रूपा काटकर सह सर्व अतिथीचं नौकरी निम्मित अजिंक्य चेन्नईत असल्यामुळे अजिंक्यची लहान बहीण भुमी च्या हस्ते वृक्ष रोप देऊन सत्कार करण्यात आला.

          त्यानंतर निमंत्रित सर्व अतिथिंनी प्रसूती कक्षात पोहचून नवजात बालिकांच्या चरणावर पुष्पवृष्ठी करून, कौतुक करीत त्याच्या मतासमवेत त्यांच्या जन्माचे, वृक्ष रोपांचे इवल्याश्या हाताने स्पर्श करवीत स्वागत केले. भारती जिराफे यांच्या तर्फे मातांना आरोग्य वर्धक साहित्य व वृक्षाई व अजिंक्यची आई प्रतिभा कायरकर तर्फे आर्थिक भेटीचे लिफाफे भेट करण्यात आले.

         विविध क्षेत्रात कार्यरत व समाजासाठी साठी आदर्श ठरलेल्या अतिथी व नवजात बालिकांच्या हाताने स्पर्श होऊन पावन झालेल्या रोपंच रोपण वैद्यकीय महाविद्यालयाच्या, पागलबाबा मठ येथील निर्माणाधीन इमारतीच्या परिसरात करण्यात येईल. डॉ. शुभांगी मत्ते यांनी दुखापत ग्रस्त असूनही वाकर घेऊन उपस्थिती दर्शविल्या बद्दल सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केले व प्रशंसा केली. बेटीयोंका सन्मान या महंत उद्देशाने पार पडलेल्या या राष्ट्रीय-सामाजिक कार्यक्रमात नेहमी सहकार्य करणारे जनविकास सेनेचे पप्पू देशमुख व समाजिक कार्यकर्ते पांडुरंग गावतुरे यांनी उपस्थिती दर्शविली. बँक कर्मी नंदिनी मडावी व अभियंता दुष्यन्त कायरकर, नर्सिंग व कर्मचारी सह अनेकांनी कार्यक्रम सफलतेसाठी सहकार्य केले.