Home Maharashtra शेतकऱ्यांना खालच्या पातळीवरुन बोलणाऱ्यांना लाज कशी वाटत नाही? — विधानसभा निवडणूक...

शेतकऱ्यांना खालच्या पातळीवरुन बोलणाऱ्यांना लाज कशी वाटत नाही? — विधानसभा निवडणूक काळात कर्जमाफी करतो म्हणणारे तुम्हीच ना? तुम्हाला विस्मरण एवढ्या लवकर कसे काय झाले? — आता खोटे बोलतांना सत्तेचा माज यायला नकोय….

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

       शेतकरी म्हणजे मतदार,आणि त्यांच्या परिवारातील प्रोढ सदस्य सुध्दा मतदारच!,याच मतदारांनी तुम्हाला महाराष्ट्र राज्याच्या सत्तेवर बसवलय,याचे भान नसणाऱ्या मंत्र्यांना शेतकऱ्यांबाबत खालच्या पातळीवरुन बोलताना थोडीतरी लाज कशी वाटत नाही?हा मुद्दा शेतकऱ्यांनाच विचार करायला लावणारा आहे.

        माजलेल्या लोकांना आमदार आणि खासदार बनविले तर त्याचे परिणाम पुढे चालून गंभीर येतात हेच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वाणितून पुढे आले आहे.

       कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणतात शेतकरी कर्ज माफ होण्याची वाट बघतात.यामुळे ते ५ ते १० वर्षापर्यंत कर्जाची परतफेड करत नाही.शासनाने कर्ज माफ केल तर आपल्या घरी लग्नाचे आणि साक्षगंधाचे कार्यक्रम पार पाडतात,शेतकरी भिकारी आहेत.

          राज्यातील करोडो शेतकऱ्यांना मानहानी कारक शब्दात बोलणारा कृषीमंत्री महाराष्ट्र राज्याला लाभलेला आहे हेच महाराष्ट्र राज्याचे सर्वात मोठे दुर्दैव आहे असे म्हणण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे.

           महायुतीच्या जाहिरनाम्यात साताबारा कर्जमुक्त (कोरा) करणार हे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुक काळात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणारच!..करणारच!..करणारच…करणारच!…करणारच!. असे दम घेऊ घेऊ निवडणूक प्रचार सभांमधून शेतकऱ्यांना व मतदारांना सांगत होते याची आठवण कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना का म्हणून नाही?

          वास्तविकता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक काळात बोलल्या प्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबाबत तगादा लावायला हवा होता.

        पण,शेतकऱ्यांना मानहानी करुन बोलताना स्वतःला धन्य मानणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यात बोलल्या प्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा दमखम नाही आणि त्यांच्या सरकार मध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा आत्मविश्वास नाही,म्हणूनच शेतकऱ्यांना खालच्या पातळीवरुन बोलताय हे खरे सत्य आहे.

        बोलल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची हिंमत महाराष्ट्र सरकार मध्ये नसल्याने उटसुट शेतकऱ्यांनाच टार्गेट करणे दस्तुरखुद्द कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कडूनच सुरू झाले आहे.

         शेतकरी स्वाभिमानी आणि अस्तित्व जपणारे आहेत.पडतीच्या काळातही सर्वांना सांभाळून घेण्याची ताकद त्यांच्यात आहे.परंतू असत्याचा डाव खेळणारे सत्तेतील राजकीय नेते शेतकऱ्यांसी कर्जमाफी बाबत खोटे बोलून गेले,याला महाराष्ट्र सरकारची मर्दांगी म्हणायचे काय?याचे जाहिरपणे उत्तर महाराष्ट्र सरकार देणार काय? आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे कान वेळतच टोचणार काय? याला अनुसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेच पाहिजे.

      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेताल मंत्र्यांना वेळीच न आवरण हा गंभीर चिंतेचा विषय आहे.याचबरोबर मंत्र्याद्वारे बेताल बोलणे म्हणजे महाराष्ट्र राज्याची शांतता भंग करणे होय.महाराष्ट्र राज्याला मागे नेने होय,अप्रगत ठेवणे होय.

         तद्वतच सत्तेचा माज मंत्र्यांना अजिबात नसावा असे त्यांनी मंत्रीपदाची घेतलेली शपथ त्यांना सांगते आहे.