Home देशविदेश आज सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त – बुद्धाच्या अहिंसावादी विचारसरणीमुळे भारत हा गुलाम...

आज सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त – बुद्धाच्या अहिंसावादी विचारसरणीमुळे भारत हा गुलाम झाला होता का? — भारत कोणामुळे गुलाम आणि कमजोर झाला बुद्धिझम मुळे की ब्राह्मणीझम मुळे?

      हे एक ऐतिहासिक सत्य आहे की भारत गुलाम होता.एक वेळा नाही अनेक अनेक वेळा भारताला आता बल होऊन गुलाम होणे भाग पडले होते. 

      परंतु मागील काही दशका पासून बुद्धतत्त्वज्ञानाची बुद्ध आचरणाची जशी जागृतीची लहर या देशांमध्ये आल्यानंतर कर्तुत्वहीन असलेली प्रसार माध्यमे ही गोष्ट मोठ्या प्रमाणात प्रसारित करीत आहे की भारताच्या गुलामीचे कारण बौद्ध राजा महाराजांचे अहिंसात्मक धोरण होते.म्हणजेच भारत बौद्धांच्या अहिंसे मुळे गुलाम झाला होता. 

      मागील काही दिवसांमध्ये योग गुरु बाबा रामदेव यांच्या पत्रिकेमध्ये अशाच आशयाचा एक लेख छापून आला होता.त्या लेखावर या देशातील न्यायप्रिय आणि विद्वानांनी आपली असहमती नोंदविली होती.

    आम्ही दूर जाऊ इच्छित नाही,केवळ बाबा रामदेव यांना इतकीच विनंती करू इच्छितो की त्यांनी इतिहासावर बोलण्या अगोदर भारताच्या इतिहासाचे अध्ययन तठस्थ बुद्धीने करावे.

      जेव्हा ते दंड बैठका काढून काढून थकून जाईल,तर इतिहासाच्या पुस्तकांसोबतच सुद्धा काही वेळासाठी कपाल भाती क्रिया करून घ्यावी. 

     जर खऱ्या अर्थाने ते असे करू लागले तर त्यांना या गोष्टीचे उत्तर सहज मिळेल की या देशाच्या गुलामीला कोण जबाबदार आहे-बौद्धां मुळे की तुमचे आदर्श पुरुष पतंजली आणि त्यांच्यासारख्या लोकांमुळे. 

      चला थोडा वेळापुरते मान्य करू की बौद्ध अपेक्षेपेक्षा जास्तच अहिंसक होते,त्या कारणामुळे आमचा देश गुलाम झाला.बाबा रामदेवजी यामुळे तुमची वीरता आणि महानता सिद्ध होत नाही. 

      या गोष्टीच्या समर्थनासाठी तुम्हाला आपल्या पूर्वजांची वीरता आणि बहादुरी ने भरलेला प्रमाणित पुरावा द्यावा लागेल.तुम्ही या माझ्या कडू प्रश्नाचे उत्तर कधी देऊ शकणार नाही. 

     आम्हाला हे समजत नाही की ज्या बौद्ध सम्राटांच्या शासन काळामध्ये कधीही विदेशी हल्ला सुद्धा झाला नाही,ते कसे या देशाच्या गुलामीला जबाबदार आहे. वास्तविकता ही आहे की ज्या पतंजली ऋषीच्या नावावर बाबा रामदेव योग व्यापार चालवीत आहे, त्या ऋषीचा प्रमुख शिष्य पुष्यमित्र शुंग इतका बहादुर आणि स्वामीभक्त होता की त्याने आपला राजा ब्रुहद्रथ मौर्य ज्याचा तो सेनापती होता,त्याच्यासोबत विश्वासघात कपट केले आणि सैन्याला सलामी देत असताना त्याच्या पाठीत खंजीर खूपसुन त्याची हत्या केली. 

         वा! ही कोणती बहादुरी आहे.जर पुष्यमित्र खऱ्या अर्थाने बहादुर होता तर त्याने आपल्या स्वामीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याची गरज का पडली?तो अंतिम मौर्य सम्राट ब्रूहद्रथ याच्या छातीवर वार करण्याची हिंमत त्याने का दाखवली नाही?

     बाबा रामदेव हे ज्या ऋषींची लढाई लढत आहे,ही तर त्यांची एक प्रकारची अवहेलना आहे. 

       बाबाजी हे आम्हाला विचारा की हा महान देश कोणामुळे गुलाम झाला.’भारत को किसने कमजोर किया बुद्धिझम ने या ब्राह्मणीझम ने ? ‘या पुस्तकाचे लेखक डॉ.सुरेंद्र अज्ञात यांनी या पुस्तकात शिवाय सुद्धा एक अधिकृत आणि विशाल ग्रंथ अगोदरच लिहून चुकले आहे.ज्यामध्ये सर्व माहिती ऐतिहासिक पुराव्यासहित दिलेली आहे. 

     प्रामाणिकतेच्या दृष्टिकोनातून या ग्रंथावर कोणी शंका घेऊ शकत नाही.परंतु शरीराने व्यायाम करण्यामध्ये आणि डोक्याने पुस्तक वाचणे यामध्ये खूप फरक आहे. 

     आवश्यक नाही की दंड बैठका मारणारा मदारी हा विद्वानच असेल आणि जर असे शक्य असेलच तर मग ते या देशाच्या हिताचे नाही.

      भारताचा चक्रवती सम्राट अशोकाचा भारत हा केवळ सर्वांपेक्षा अधिक शक्तिशाली आणि सुरक्षितच नव्हता,तर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सुद्धा विशाल होता.

      अशोकाच्या पूर्ण जीवन कालखंडामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्याचे कार्य हाती घेतले तेव्हापासून भारतावर आक्रमण करणे तर फार लांबची गोष्ट आहे.भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या एखाद्याही राजाचे उदाहरण मिळत नाही. 

        अशोक सम्राट भलेही अहिंसाच्या मार्गावर चालत होता, तरी तो इतकाही अहिंसक नव्हता की कोणताही शत्रू त्याच्या राज्यावर आक्रमण करू शकेल. 

       सम्राट अशोकाने संपूर्ण भारतभर शिलालेख आणि धम्म स्तंभावर धम्माचा आदेश कोरून ठेवला.या लेखांमध्ये प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी सुद्धा सम्राट अशोकाने संदेश लिहून ठेवला.प्राणीमात्रांच्या जीवाचे संरक्षण करणारा राजा म्हणून सम्राट अशोकाला जगात ओळखल्या जाते.परंतु याच सम्राटाने पश्चिमेकडील सीमेवर खरोष्टी भाषेमध्ये जो शिलालेख कोरून ठेवलेला आहे त्यामध्ये लिहिलेले होते –

      “अष्टवर्षामिसिक्त देवानां प्रिय प्रियदशी राजा (अशोक) कडून कलिंग जिंकला गेला.दीड लाख प्राणी (मनुष्य) तेथून अपहरण झाले,एक लाख जखमी आणि याच्यापेक्षा अनेक पटीने मृत्युमुखी पडले…..(अशोक के शिलालेख पृष्ठ 59, लेखक डॉक्टर राजबली पांडेय,2022 संस्करण,ज्ञान मंडल लिमिटेड वाराणसी)

     उपरोक्त शिलालेख तक्षशिला प्रांताच्या पश्चिमे मध्ये वर्तमान जिल्हा शहाबाद गडी येथे स्थापित आहे.महामार्गाच्या मधोमध स्थापित या शिलालेखाला वाचून कुणी कसे काय आक्रमण करू शकते. या शिलालेखामध्ये जखमी/मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा तपशील वाचून मोठ्या मोठ्यांची बोलती बंद होत होती.

      पूर्वी प्रस्थापित लोकांचे भाट असायचे,आता या भाटाचे काम उत्तम प्रकारे प्रसार माध्यमे करीत आहे.आज बाबा रामदेव,अण्णा हजारे आणि निर्मल बाबा यांचा जन्म आमच्या प्रसार माध्यमाच्या पोटातूनच जन्म झालेला आहे.

       योग्यतेच्या बळावर आपल्या मोठेपणाचे वर्चस्व मान्य करायला लावणे आणि मीडियाच्या जोरावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणे या दोन्ही गोष्टी मध्ये खूप अंतर आहे. 

      म्हणून आम्ही बाबा रामदेव यांना सांगी इच्छितो की बौद्ध/मौर्य सम्राटांना कर्तुत्व हीन सिद्ध केल्याने तुमचे मोठेपण सिद्ध होत नाही. 

    बौद्धांची अहिंसा जर भारताच्या गुलामीला कारणीभूत होती,तर व्हिएतनाम सारख्या लहानशा देशाने जगातील सर्वात शक्तिशाली देश अमेरिकेला चॅलेंज देऊन आपली बहादुरी सिद्ध का केली. 

       व्हिएतनाम चे बौद्ध नागरिक अनेक दशकापासून अमेरिकेसोबत संघर्ष करीत आलेले आहे,परंतु त्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून अमेरिके सारख्या देशाला एक इंच जमीन सुद्धा ताब्यात घेऊ दिली नाही.

     एक लहानसा बौद्धांचा देश व्हिएतनाम ने अमेरिकेसारख्या शक्तिशाली देशाची नामुष्की केली, हे साऱ्या जगाने पाहिले आहे. 

      बाबा रामदेव जी आपण जपानच्या संदर्भामध्ये काय विचार करीत आहे,हा सुद्धा एक बुद्धिस्ट देश आहे,काय कोणत्याही प्रकारे हे राष्ट्र कोणत्याही राष्ट्राच्या तुलनेत मागासलेले किंवा कमजोर आहे काय? नाही ! जपान मागासलेले आणि कमजोर राष्ट्र नाही, या उलट ते हर प्रकारे सबळ आणि सुदृढ राष्ट्र आहे.हे ज्ञान तर बाबा रामदेव यांना सुद्धा असायला पाहिजे. 

      मी केवळ इतकेच सांगू इच्छितो की या रामदेव बाबा यांनी देशाच्या आणि राष्ट्राच्या कल्याणासाठी काहीतरी काम केले पाहिजे.देशाला केवळ बयानबाजी नको, मजबुती पाहिजे आहे.

       मजबुती निर्माण होते जनतेच्या चरित्रातून,चरित्रामधूनच सदाचार निर्माण होतो.तेव्हा दुराचार आणि भ्रष्टाचार याला शिव्या शाप देण्याची गरज पडत नाही तो आपोआपच समाप्त होऊन जाईल.

      या देशातील सर्व जनतेची मनापासून इच्छा आहे की आमचा देश प्रत्येक प्रकारच्या कमजोरी पासून मुक्त व्हावा आणि हे साध्य जोपर्यंत प्राप्त होऊ शकत नाही,जोपर्यंत आम्ही त्या गोष्टीचा इमानदारीने विचार करत नाही की ज्या कारणामुळे आमचा देश कमजोर झाला होता. 

      आमची खात्री आहे की हा भारत देश गुलाम झाला याला जबाबदार बुद्ध धर्म नसून बौद्ध धर्मा नंतर आलेला ब्राह्मणवाद भारताच्या गुलामीला जबाबदार आहे.

         सनातनी बुद्धिस्ट 

            प्रा.गंगाधर नाखले..‌ 

          संपर्क क्रमांक :- 7972722081