महामहीम राष्ट्रपती यांच्या गडचिरोली दौ-यासाठी गडचिरोली पोलीस दल सज्ज… — ५ जुलैला गोंडवाना विद्यापीठात होणा-या दिक्षांत समारंभासाठी भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू राहणार उपस्थित.

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

          महामहीम राष्ट्रपती यांच्या दौ-यादरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन गडचिरोली पोलीस दल सज्ज झाले असुन त्याकरीता तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. यामध्ये 151 अधिकारी, 639 पुरुष व महिला अंमलदार, 8 एस. आर. पी. एफ. चे प्लाटुन, 11 सि-60 चे पथके, वायरलेस, मोटार परिवहन विभाग व ईतर असे 1500 अधिकारी/अंमलदार तैनातीस आहेत.

          महामहीम राष्ट्रपती व अतिमहत्वाच्या व्यक्तीसाठी वापरण्यात येणारा कोटगल टी- पॉईंट ते कोर्ट टी-पॉईंट हा मार्ग सामान्य नागरीकांना दिनांक 05/07/2023 चे पहाटे 05.00 वा. पासुन सायंकाळी 17.00 वाजेपर्यंत रहदारीसाठी बंद राहणार आहे. सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की आपण सदर मार्गाचा वापर न करता पर्यांयी मार्गाचा वापर करावा.