उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक..
प्रशासक सरपंच यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे दिलेला पदाचा राजीनामा कोणी स्विकारायचा याबाबत मार्गदर्शक तत्वप्रणाली नसल्याने घोळ निर्माण झाला असल्याचे दिसून आले.
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर,नागभिड,ब्रम्हपूरी,गटविकास अधिकाऱ्यांकडे प्रशासक सरपंचांनी राजीनामे दिलेले आहेत.मात्र प्रशासक सरपंच यांचे राजीनामे स्विकारण्याचे अधिकार कुणाला आहेत हे स्पष्ट नसल्याने गटविकास अधिकारी बुचकळ्यात पडले आहेत.
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रशासक सरपंच यांचे राजीनामे स्विकारण्याबाबत व पुढील कारवाई बाबत गटविकास अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन मागितले आहे.
परंतु चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हा मार्गदर्शन करतात आणि प्रशासक सरपंचांची राजेनामे केव्हा मंजूर केली जातात हे गुलदस्त्यातील कोडे आहे.



