सततच्या वादळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा… — कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने त्वरित मदत करावी युवा सेना विधानसभा समन्वयक प्रतीक राऊत यांची मागणी…

 

युवराज डोंगरे/खल्लार प्रतिनिधी

सतत आठ दिवसापासून दर्यापूर तालुक्यामध्ये दररोज वादळी वाऱ्यासह पडत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे गेल्या आठ दिवसापासून तालुक्यात वादळ वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत असून तालुक्यातील खल्लार, उपराई, वडुरा ,महिमापुर, चंडिकापूर,दारापूर, मार्कंडा, डोंगरगाव, दिघी जहानपूर, संपूर्ण परिसरात शेतकऱ्यांचा गहू कांदा तसेच इतर फळबागांचे नुकसान झाले आहे परिसरातील शेतकऱ्यांनी गहू साठवून ठेवला असून काहींचा गहू उभा असताना वादळी पावसाने तो खाली पडला आहे तसेच कांदा पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे एप्रिल महिना उलटून गेला असून मे महिन्यात सुद्धा पाऊस राहणार असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत केव्हा करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. तालुक्यातील आधी संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करून नुकसान भरपाई देण्यात यावी ,अशी मागणी युवा सेना विधानसभा समन्वयक प्रतिक राऊत यांनी केली आहे.