आळंदी आणि पंचक्रोशीतून बाजार समितीसाठी ११ जनांचे अर्ज दाखल… — माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पा.सोमनाथ मुंगसे, अनिकेत कुऱ्हाडे यांचे अर्ज दाखल…

 

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

आळंदी : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २०२३ ते २०२८ च्या संचालक पदासाठी येत्या २८ एप्रिल रोजी निवडणूक होत असुन शेवटच्या दिवशी सहकारातील अनेक मातब्बर नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यात आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या सहीत तालुक्यातील आजी-माजी सभापती, संचालक, विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत.

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकी साठी आळंदी,चऱ्होली खुर्द, मरकळ, धानोरे, सोळू, केळगाव या गावातील ११ जनांनी अर्ज दाखल केले आहेत यात प्रामुख्याने आळंदी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, माजी सरपंच राजाराम लोखंडे, सोमनाथ मुंगसे, अतुल ठाकुर, माजी उपसरपंच वासुदेव मुंगसे, पंडित गोडसे, कैलास थोरवे, आनंदा लोखंडे, अनिकेत कुऱ्हाडे, प्रताप थोरवे यांनी कृषी पतसंस्था व बहुद्देशीय सहकारी संस्था सदस्य मतदार संघातून सर्व साधारण गटात अर्ज दाखल केले आहेत. चर्होली खुर्द ग्रामपंचायतीचे सदस्य अनिकेत कुऱ्हाडे यांनी ग्रामपंचायत सदस्य मतदार संघातून सर्व साधारण गटात सुध्दा अर्ज दाखल केला आहे, तसेच कृषी पतसंस्था व बहुद्देशीय सहकारी संस्था सदस्य मतदार संघातून महीला गटात धानोरे येथील सारीका चेतन गावडे यांनी अर्ज दाखल केला आहे. 

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १८ जागांसाठी एकूण १६३ अर्ज दाखल झाले आहेत, कृषी पतसंस्था व बहुद्देशीय सहकारी संस्था सदस्य मतदार संघात सर्व साधारण ७, महीला राखीव २, इतर मागासव प्रवर्ग १ आणि अनुसूचित जाती जमाती १ अशा एकूण ११ जागांसाठी १०५ अर्ज दाखल झाले आहेत, ग्रामपंचायत सदस्य मतदार संघात सर्वसाधारण २, अनुसूचित जाती जमाती १, आर्थिक दुर्बल घटक १ अशा एकूण ४ जागांसाठी ३५ अर्ज दाखल झाले आहेत, तसेच व्यापारी आणि आडते २ जागांसाठी १८ अर्ज आले आहेत, हमाल आणि तोलारी १ जागेसाठी ५ अर्ज दाखल आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी ५ एप्रिलला होईले आणि ६ एप्रिल रोजी पात्र ठरलेल्या अर्जांची यादी प्रसिद्ध होणार आहे. तसेच अर्ज सादर केलेल्या उमेदवाराला जर निवडणुकीतून माघार घ्यायची असेल तर २० एप्रिल रोजीपर्यंत संबंधित उमेदवाराला माघार घेता येणार आहे. यानंतर २१ एप्रिल रोजी उमेदवारांची यादी, माघार घेतलेल्यांची यादी आणि चिन्ह वाटप केलं जाणार आहे. यानंतर मग २८ एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.आमदार दिलीप मोहिते पाटील आपल्या पॅनलमधून कोणाला अधिकृत उमेदवारी देतात हे पाहणे गरजेचे आहे. विरोधी पक्षांकडून सर्वपक्षीय पॅनल तयार केला जाणार आहे.