व्यक्तिमत्व विकासासाठी खेळ महत्त्वाचा:भाग्यश्री आत्राम… — कोरेल्ली येथे कबड्डी व क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण..!

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

अहेरी:- खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास सहजपणे होऊ शकतो. शारीरिक व मानसिक दृष्ट्या खेळाडू खेळातून कणखर बनतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले. मेडपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कोरेल्ली येथील क्रिकेट व कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राकॉ अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार,येरमनार चे माजी सरपंच बालाजी गावडे,कमलापूर चे माजी सरपंच सांबय्या करपेत,पोलीस पाटील कपिल देव आत्राम,शिवा गर्गम, अनिल दुर्गे,ग्रा प सदस्य रंजना,सुरेश पेंदाम,सुरेखा कांबळे, मंगेश आत्राम,सुनील दुर्गे,वारलु आत्राम,देवाजी सडमेक,राकेश महा,रितेश गावडे तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        पुढे बोलताना व्यक्तिमत्व म्हणजे माणसाचा सर्वांगीण विकास होय. या सर्वांगीण विकासामध्ये शारीरिक व मानसिक सदृढता महत्त्वाची असते. खेळाच्या माध्यमातून व्यक्ती हा सुदृढ बनत असतो व व्यक्तिमत्व विकासाचा पहिला प्रभाव म्हणजे त्याची शरीरयष्टी. त्याचे दिसणे, वागणे, चालणे, बोलणे या बाबी खेळांच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकसित होत असतात. मानसिक विकासामध्ये खेळाडू हा खेळाच्या माध्यमातून सक्षम बनत असतो.त्यासाठी नियमित खेळने आवश्यक असल्याचे मत भाग्यश्री आत्राम यांनी व्यक्त केले. तर,या स्पर्धेतील विजेत्या संघांना शुभेच्छा दिले.

       कोरेल्ली येथे 31 मार्च पासून कबड्डी व क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.3 एप्रिल रोजी अंतिम सामने खेळण्यात आले. यामध्ये क्रिकेट स्पर्धेत चंद्रा ने प्रथम तर कोरेली ने द्वितीय पारितोषिक पटकाविले. तर,कबड्डी स्पर्धेत प्रथम व द्वितीय पारितोषिक हे कोरेल्ली ने पटकाविले.विजेत्या संघांना भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते सायंकाळच्या सुमारास बक्षिस वितरण करण्यात आले.