शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या महिला अघाड़ी द्वारे छत्रिपति शिवाजी पार्क येथे हळदी- कुंकुवाच्या कार्यक्रमाचे आयोजन.

 सैय्यद ज़ाकिर 

जिल्हा प्रतिनिधी वर्धा..

हिंगणघाट :– छत्रपति शिवाजी महाराज पार्क मध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून हड़दी कुंकु कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

        या कार्यक्रम शहर संघटिका सौ.सीमा गलांडे तथा माजी नगरसेविका सौ.नीता धोबे,सौ.कोमल गुदघाने यांच्या नेतृवात घेण्यात आला.

          आपल्या भारतीय संस्कृती मध्ये हल्दीकुंकु कार्यक्रम साजरे करण्याला अनन्य साधारण महत्व आहे। हड़दी कुंकुवाच्या निमित्ताने अपन या सुवासिनिना आपल्या घरी आमंत्रित करतो,या सुवासिनी साक्षात अदिशक्तीचे स्वरूप म्हणून आपल्या घरामध्ये येतात आणि आपन जेव्हा त्यांना हड़दकुंकु लावतो तेव्हा शाक्षात त्यांच्यात आदिशक्तिचे रूप जागृत होते.

          त्या मुळे आपन अप्रत्यक्ष रीतीने देवीची म्हणजे आदी शक्तीची पूजा करतो.म्हणून हडदी-कुंकु निमित्ताने शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सर्व सुवासिननी एकत्र करुन पार्क मध्ये त्यांना वाण वाटण्यात आले आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन त्यांना एक भेंट वस्तु देण्यात आल्यात.

         शिवसेना महिला अघाड़ीच्या सौ.सारिका अनासाने,सौ.सिमा खुपसरे,सौ. नीलिमा मोहमारे,सौ.जोती वरघने,सौ.मेघा गुडकरी,सौ. रुपाली आवारी,सौ.स्वाति पिपड़कर,सौ.वर्षा धोबे,सौ.नेहा शाहू,सौ.प्रियंका धोटे,सौ.सारिका सातपुते,सौ.सुवर्णा वैध,सौ.स्मिता अश्टिकर,सौ.सविता धोबे,सौ. अर्चना दानी,सौ.रेशमा बाकरे, सौ.मंगला ठवरे,सौ.रजनी झाड़े,सौ.संजीवनी मानकर,सौ.मंदा धोबे उपस्थित होत्या.