अबोदनागो एस.चव्हाण
जिल्हा प्रतिनिधी अमरावती
दखल न्युज भारत
अमरावती :- गाडगे नगर पोलीस स्टेशन हद्दीत वरिष्ठ नागरिकावर मध्यरात्री दोन अनोळखी तरुणांनी हल्ला करून मोबाईल लूटन नेल्याच्या प्रकरणात डीबी पथकाने अवघ्या दोन दिवसांत दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळवले.
घडलेली घटना 30 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे 1.48 वाजता वीएमवी रोडवरील कावरे आयुर्वेदिक दवाखान्याजवळ घडली. फिर्यादी अरविंद मनोहर विंचुरकर (65 वर्षे), रा. तारांगण नगर, शेगाव नाका, अमरावती हे नागपूरहून महासंघातील सदस्यांसोबत परतत असताना ही लूट घडली.
‘पाणी आहे का?’ प्रश्न विचारून अचानक ढकलले आणि लुटले…
फिर्यादी पायी जात असताना कावरे आयुर्वेदिक दवाखान्याजवळ 25 ते 30 वयोगटातील दोन अनोळखी युवकांनी त्यांना अडवून “पाणी आहे का?” असा प्रश्न विचारला. त्यांनी “नाही” असे उत्तर देताच त्या दोघांनी फिर्यादीला मागून जोरात ढकलून पाडले.
फिर्यादी जमिनीवर कोसळल्याने त्यांच्या नाकाला आणि चेहऱ्यावर मार लागून रक्तस्राव झाला. धक्क्यात त्यांच्या डोळ्याचा चष्माही खाली पडला.
या अवस्थेत असताना दोन्ही आरोपींनी त्यांच्या शर्टाच्या खिशातून रेडमी कंपनीचा मोबाईल (क्र. 9765409564) जबरदस्तीने हिसकावून घेत पळ काढला. फिर्यादीने दिलेल्या माहितीवरून ते समोर आल्यास ओळखू शकतो असे नमूद केले.
घटनेवरून गाडगे नगर पोलीस ठाण्यात कलम 309(4), 3(5) भा.न्या. संहिता अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सिसिटिव्ही, गुप्त माहिती आणि पथकाची कारवाई : आरोपीची ओळख पटली…
तपासादरम्यान घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्याचवेळी गुप्त बातमीदाराकडूनही खात्रीशीर माहिती मिळाल्याने दोन संशयित युवकांचा ठावठिकाणा निश्चित झाला.
यानंतर डीबी पथकाने रणनीती आखून 02 डिसेंबर 2025 रोजी ग्राम रासेगाव येथे सापळा रचला आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले….
1. अक्षय बाळू जुनघरे (30 वर्षे), रा.नवसारी, अमरावती
2. अक्षय गजानन नेमाळे (27 वर्षे), रा.इंदिरा गांधी झोपडपट्टी, रासेगाव, ता.अचलपूर, जि.अमरावती
अटकेनंतर त्यांच्या ताब्यातून लुटलेला मोबाईल फोन जप्त करण्यात आला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार डिबी पथकाची अचूक मोहीम…
ही यशस्वी कारवाई वरिष्ठ अधिकारी पोलीस आयुक्त श्री. अरविंद चावरीया,पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त, गाडगे नगर विभाग शिवाजीराव बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल वर, पोनी क्राइम विजया पंधरे, प्रशासन पोनी वाठोरे यांच्या देखरेखीखाली डीबी पथकाने केली.
या कारवाईत सपोनि. मनोजकुमार मानकर (पथकप्रमुख), पोहेकॉ.भारत वावखडे, प्रकाश मीसाळ, नंदकीशोर करोची, नापोकॉ.आशीष ठाकरे, पोकॉ. सुशांत प्रधान, मतिन शेख यांनी सहभाग घेतला.

