धानोरे गावचे युवा नेते गणेश गावडे पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : खेड तालुक्यातील धानोरे गावचे सुपुत्र गणेश हंबीर गावडे पाटील यांनी लांडेवाडी येथील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या जनता दरबारामध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांची शिवसेनेत सहर्ष स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी आढळराव पाटील यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

         या पक्षप्रवेशावेळी शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, युवासेना जिल्हाप्रमुख धनंजय पठारे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी शिरसाट, उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, युवासेना तालुकाप्रमुख विशाल पोतले, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख संभाजीराव कुडेकर, शिवसेना विभागप्रमुख राहुलशेठ थोरवे, युवासेना उपतालुका प्रमुख योगेश पगडे, सहकार सेनेचे उपतालुकाप्रमुख शंकरराव घेनंद, युवासेना उपतालुकाप्रमुख संदिप काचोळे, युवासेना उपविभागप्रमुख सचिन विरकर, युवासेना उपविभागप्रमुख मयुर रणपीसे, सचिन विरकर, चिंचोशी गावचे मा.सरपंच युवराज भोसकर, मा.सरपंच संजय गोकुळे, चेअरमन देवानंद निकम, मा.चेअरमन मंगेश निकम, हरिदास गोकुळे, युवासेना शाखाप्रमुख विठ्ठल गावडे, वडगाव घेनंद शाखाप्रमुख ऋषिकेश घेनंद, युवासेना शाखाप्रमुख शुभम पठारे, अक्षय जाधव, रोहित बोडके आदी उपस्थित होते.