युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
महर्षी वाल्मिकी गुरुदेव सेवा गणेशत्सोव मंडळ, सायतच्या वतीने दि 2 सप्टेंबरला गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये गावातील एकुण 48 नागरिकांनी तपासणी करुन सहभाग घेतला.
बीपी, शुगर , ताप, सर्दी , खोकला यांची तपासणी यावेळी करण्यात आली. मंडळाच्या वतीने आरोग्य तपासणीसाठी उपस्थित असलेल्या सर्व डॉक्टर,आशा वर्कर यांचे शॉल पुश्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
यामध्ये डॉ. स्नेहल निवाने वैद्यकीय अधिकारी, सायत नंदा गावंडे आरोग्य सेविका, ढोमणे आरोग्य सेवक रमाताई नितनवरे, सौ कडू आशा वर्कर,निलेश अवघड पोलिस कर्मचारी यांचा सहभाग होता.
आरोग्य तपासणी शिबिराच्या यशस्वीतेकरिता मंडळाचे पदाधिकारी विक्रम मानकर , अमोल थोरात , अनिकेत इंगळे, नितीन ठाकरे , अमोल मानकर, रोशन मानकर , सौ.कोमल नि. ठाकरे , सौ. दर्षाली ग. मानकर यांनी परिश्रम घेतले.



