उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक…
चिमूर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने शिक्षणासाठी तालुक्यातील हजारो विद्यार्थी चिमूरला दररोज आवागमन करतात.परंतु बस चालक बऱ्याच वेळा अनेक बस थांब्यावर,बस थांबवत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहेच!..
असाच प्रकार आज घडला असून विद्यार्थ्यांचे पेपर सुरू असताना जांभुळघाट बस थांब्यावर बस चालकांनी चिमूर आगाराची एसटी बस थांबवली नाही.
यामुळे एका विद्यार्थ्यांच्या मनात भविष्याभाबत चिंता निर्माण झाली व याच चिंतेतूनच त्यांनी बसच्या मागच्या भागाला दगड मारु काच फोडली असल्याची आगळीवेगळी आणि दुर्दैवी घटना घडली.
चिमूर आगाराची एसटी बस कान्पा वरुन चिमूर कडे मार्ग क्रमण करीत होती.एम.एच.४०,ए.क्यु.६०४८ क्रमांकाची बस जांभुळघाट बस थांब्यावर चालकांनी थांबवली नाही.
यामुळेच विद्यार्थ्यांच्या भविष्याचे नुकसान करणाऱ्या बस चालकांनी पुढे चालून पेपर सुरू असताना कुठल्याही विद्यार्थ्यांचे नुकसान करु नये म्हणून बसच्या मागच्या भागाला दगड मारला व काच फोडली.
एका विद्यार्थ्यांकडून बसची काच फोडने ही घटना बेकायदेशीर आणि दुःखदायक आहे.पण,बस खाली असेल तर समजदारीने बस चालकांनी बस थांब्यावर बस थांबवून विद्यार्थ्यांना नेले पाहिजे अशी सकारात्मक मानसिकता बस चालकांची असली पाहिजे या मताचे नागरिक आहेत.
बस ची काच फोडल्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.यानंतर घटनेची माहिती भिसी पोलिसांना दिली,भिसी पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व काच नुकसानीचा पंचनामा करून प्रकरण शांत केले.
सदर घटना महाराष्ट्र राज्यांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील आहे,मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे…
(मौजा जांभुळघाट,ता.चिमूर येथील घटनाक्रम आहे.)



