रमाई जयंती निमित्ताने आरोग्य मेळावा व रक्तदान शिबिराचे आयोजन…

       ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

         साकोली – सुमेध बुद्ध विहार एकोडी च्या वतीने ७ फेब्रुवारी २०२४ रोज बुधवार ला मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने भव्य आरोग्य मेळावा व रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

      त्यामध्ये नेत्र तपासणी, दंतचिकित्सा, त्वचारोग, कॅन्सर, रक्तगट, बी पी शुगर,जनरल तपासणी व रक्तदान शिबिर होणार आहे त्यामध्ये जिल्हा रुग्णालय भंडारा येथील तज्ञ डॉक्टरांची चमू एकोडी ला येणार आहे.

            तरी सर्व गावकरी व परिसरातील जनतेनी या आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान सुमेध बुद्ध विहार कमिटीने केले आहे.