संपूर्ण जगाला ज्ञानाचा मार्ग दाखविला असे श्री संत जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांनाच संत जगद्गुरु अशी पदवी आहे… — श्री गुरु जयवंत महाराज बोधले किर्तन शेवे प्रसंगी बोलत होते…

  बाळासाहेब सुतार 

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी

         संपूर्ण राज्यामध्ये प्रसिद्धी आसणारे लक्ष्मीनरसिंह देवस्थानच्या पावन भूमीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय गाथा भजन सोहळा चालु असून, सप्ताहाची चौथी कीर्तन सेवा श्री गुरु डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांची झाली.

          900 हुन अधिक टाळकरी कीर्तन सेवेसाठी उपस्थित होते. तसेच 7 ते 8 हजार रोज भाविकांच्या उपस्थितीत श्री गुरु बापूसाहेब महाराज देहुकर यांच्या 65 व्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त पुणे, सोलापूर, सातारा,नगर, या चार जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते.

             सर्व भागातील कार्यकर्ते पदाधिकारी व आजी-माजी सरपंच उपसरपंच तसेच पंढरपूर देवस्थान कमिटी, आळंदी देवस्थान कमिटी व देहू संस्थांचे सर्व पदाधिकारी व लक्ष्मी नरसिंह देवस्थान कमिटी ,या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या सप्ताहासाठी दररोज किर्तन सेवेसाठी उपस्थितीत आहेत. सप्ताहाचे व्यासपीठ चालक ह भ प अंकुश महाराज रणखांबे विणेकरी वेदमूर्ती आनंद काकडे काका तर श्री शेत्र निरा नरसिंहपुर सप्ताह कमिटीच्या वतीने व परीसरातील शंभर हून अधिक गावांचा यामध्ये समावेश आहे.

               सप्ताहासाठी बुधवार दिनांक 1/ 11 /2023 रोजी श्री गुरु डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांची कीर्तन सेवा झाली. हा अभिष्टचिंतन सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहासाठी दररोज आलेल्या सर्व वारकरी भाविक भक्त व श्रोते यांना मोठ्या प्रमाणात अन्नदान सेवा ही दररोज देण्यात येत आहे. व आनंदाने याचा लाभ भाविक घेत आहेत. 

           सप्ताहाच्या शेवटी रविवार दिनांक 5/11/2023 रोजी लक्ष्मी नरसिंहच्या पावन भूमीमध्ये श्री गुरु बापूसाहेब महाराज देहुकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा व सन्मान हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. 

            तसेच सकाळी 8 वाजता संपूर्ण गाव दिंडी प्रदक्षिणा टाळ आणि मृदंगाच्या आवाजात घेण्यात आल्यानंतर सकाळी 9 ते11 या वेळेत श्रीगुरु बापूसाहेब महाराज देहुकर यांचे काल्याचे किर्तन होईल व नंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप केल्यानंतर सप्ताहाची सांगता होईल.

            पहिल्यापासून ते शेवटपर्यंत संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सप्ताह कमिटीचे कार्य अध्यक्ष ह भ प राम महाराज अभंग व ह भ प महेश सुतार महाराज हे करीत आहेत.