“पाश्चिमात्यांचा आजपर्यंत एक गैरसमज होता की, भारतात वैचारिक लढाई आणि मूलभूत हक्कासाठी जनता क्रांतीसाठी रस्त्यावर उतरू शकत नाही. स्वतंत्र देशाचे पहिले उदाहरण राजधानी दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन, ज्यामध्ये तीन काळे कृषी कायदे सरकारकडून रद्द करून घेतले. आणि आता हे मराठा आरक्षणाचे हे आंदोलन. भलेही हे आंदोलन संविधानिकदृष्ट्या यश येणारे नसले किंवा किचकट असले तरी……
या आंदोलनाने एक निश्चित उदाहरण येणाऱ्या काळासाठी करून ठेवले आहे की, जनता आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरू शकते….
भलेही तुमच्याकडे सत्ता, पैसा, पतपाणि ‘कुटनीतीचे षडयंत्र ( जीचा वापर करून फडणवीसने अख्खा महाराष्ट्र नासवला) ‘ कितीही असू द्या, परंतू तुम्ही मनोज पाटील जरांगे आणि मराठा आंदोलकांना मुंबईच्या आझाद मैदान, CSMT, चर्चगेट, मुंबईतील रस्त्यावर येण्यापासून तुम्ही रोखू शकला नाहीत. हे तुमच्या ‘कूटनीतीचे ‘अपयश आहे. कोणत्याही सार्वजनिक आणि व्यक्तीसापेक्ष व्यवहारात जर नैतिकता नसेल तर ते यशस्वी कदापि होऊ शकत नाही. केवळ ज्या आंदोलनात हजारोच्या संख्येने सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरते. ते आंदोलन एक तर यशस्वी होतेच किंवा पुढील काळातील याहून मोठ्या आंदोलनाची नांदी ठरते…..!
जसे भूकंपाची चाहूल लागली की प्रथम उंदरांना कळते तसे दंगलीची किंवा आंदोलनाची चाहूल लागली की राजकारणी नेते त्याजवळ फडकत सुद्धा नाहीत ( मराठा असून सुद्धा एकनाथ शिंदे ऐनवेळी सातारा आपल्या गावी गेले ).
मनोज जरांगे पाटील हे कितीही मोठ्या राजकीय नेत्याला एकेरी भाषेत, शिवराळ भाषेत बोलतात. याचा अर्थ ते सुसंस्कृत नाहीत असा होत नाही. याचा अर्थ एवढाच घ्यावा की त्यांच्या (म्हणजेच मराठा आंदोलकांच्या) मनात यांच्याविषयी किती संतापाची लाट उसळलेली आहे. या राजकीय पक्षांच्या राजकारण्यांनी किती महाराष्ट्र स्वार्थी नितिभ्रष्ट राजकारणातून महाराष्ट्र कसा संपून टाकलाय याची ही चीड आहे. म्हणून हा संताप आग ओकत आहे. नाहीतर कुणी एखादा राजकारणी एखाद्या दुसऱ्या विरोधीपक्षाच्या नेत्याविरुद्ध एक जरी अपशब्द वापरला तर कोट्यावधी रुपयाच्या अब्रूनुकसानीचे खटले दाखल करण्याची भाषा वापरतात. इथे काय तुमचे तोंडं शिवलेत काय……..?
कारण इथे मनोज जरांगे पाटलाकडे जी नैतिकता आणि चारित्र्य आहे. ते यांच्याकडे कुणाकडेच नाही. म्हणून यांची तोंडे शिवलेली आहेत…..!
म्हणून, या आंदोलनाला यश येईल अथवा ना येईल. परंतू , येणाऱ्या पुढील काळात मात्र विविध राजकीय पक्षांच्या विशेषतः भाजप, RSS, मोहन भागवत मोदी, शहा आणि फडणवीस व त्यांच्या मित्र पक्षांचे मराठा नेते सुद्धा यांची गणिते मात्र यशस्वी होणार नाहीत….!
ही काळ्या पाषणावरील कोरीव सुवर्ण रेष आहे…..!
शिवाय या रस्त्यावर उतरलेल्या आंदोलनाने पाश्चिमात्यांना सुद्धा भारतीय जनतेची चपराक बसली आहे…….!
टीप :- गेल्या 8 ते 10 दिवसापासून तब्येत बरी नसल्यामुळे आणि खोकला खूप त्रास देत असल्यामुळे गेल्या 10 दिवसात एकही पोस्ट किंवा व्हिडीओ बनवून आपल्या पर्यंत पोहचवू शकलो नाही. त्याबद्दल क्षमस्व.


