मुरुमगाव येथील भर चौकात ट्रकनी दिली दुचाकीला धडक..  — एक जखमी.. 

 

धानोरा/भाविक करमनकर 

        धानोरा तालुक्यातील मौजा मुरुमगाव येथील मुख्य मार्गावर आज सायंकाळी 4:00 वाजता छत्तीसगढ वरून गडचिरोली कडे CG.08-AT9295 या क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगाने येत असताना मौजा मुरुमगाव येथील मुख्य मार्गावर भर चौकात मोटरसायकल स्वारला धडक दिली.

      यात मोटरसायकल स्वार गंभीर स्वरूपात जखमी होऊन घटनास्थळीच बेशुद्ध अवस्थेत पडला असता त्याला त्वरीत प्राथमिक आरोग्य केंद्र उपचार करून ग्रामीण रुग्णालय धनोरा यथे रेफर करण्यात आले.मोटरसायकल स्वार हा मौजा बेलगाव येथील रहिवासी असून त्याचे नाव हूमनसिगं किरसान आहे.( वय 42 वर्ष) आहे व ट्रक चालकाचे नाव हेमंत कुमार( वय 45 वर्ष) रा.बालोद छत्तीसगढ राज्यातील असून त्याच्या सोबत क्लिनर आहे व त्याचे नाव प्रकाश निरमलकर( वय 38) रा. बालोद चा आहे.

        हा ट्रक सूरजागड प्रकल्पातून लोह खनिज छत्तीसगढ रायपूर ला खाली करून परत रायपूर छत्तीसगढ वरून ट्रक सुरजागड ला जात असताना ट्रक च्या दुचाकीला धडक देऊन अपघात झाला. ट्रक चालकांने पोलीस मदत केन्द्र मुरुमगाव पोलीस यांनी ट्रक व ट्रक चालकाला ताब्यात घेतले.