बुद्ध पौर्णिमा निमित्ताने संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम.

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

         साकोली-महामाया ग्रुप साकोली च्या वतीने ५ मे २०२३ रोज शुक्रवार ला सायंकाळी ६ . वाजता बुद्ध पौर्णिमे निमित्ताने संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम (कव्वाली) चे आयोजन करण्यात आले आहे.  

 महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रबोधनकार फुले शाहू आंबेडकरी गीतांचा बुलंद आवाज भीमेश भारती, नागपूर यांचा प्रबोधनात्मक गीत गायनाचा कार्यक्रम विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, तालुका स्मारक समिती बुद्ध विहार एकोडी रोड साकोली येथे आयोजित करण्यात आले आहे.

      या कार्यक्रमाचे उदघाटक आमदार नानाभाऊ पटोले अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी, अध्यक्ष जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती मदनभाऊ रामटेके, सह उदघाटक दीपक हिवरे अध्यक्ष भाजप युवा मोर्चा साकोली, अमोलजी टेम्भुरने सामाजिक कार्यकर्ता , सचिन गजभिये सामाजिक कार्यकर्ता निखिल जिभकाटे राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष, राहुल राऊत सामाजिक कार्यकर्ता, दीपक साखरे अध्यक्ष तालुका स्मारक समिती, उपाध्यक्ष अशोक रंगारी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मध्ये संपन्न होणार आहे. 

    तरी परिसरातील सर्व बहुजन बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आव्हान महामाया ग्रुप चे आयोजक समितीचे धम्मा वासनिक, शुभम राऊत, अनिकेत कान्हेकर, निश्चय मेश्राम, मुन्ना डोंगरे, भावेश कोटांगले , चिराग जनबंधु, मोहित कऱ्हाडे, रक्षित कांबळे यांनी केलेलं आहे.