पन्नेमारा ग्रामपंचायत अतंर्गत येणारे मार्गाचे निर्माण कार्य करण्यात यावे… — ग्रामपंचायत ने केले ठराव पारित…

भाविक करमनकर

धानोरा तालुका प्रतिनिधि 

          धानोरा तालुक्यातील मुरुमगाव ग्रामपंचायत ला लागूनच पन्नेमारा ग्रामपंचायत अतंर्गत येणारे पन्नेमारा- बेलगाव मार्ग अडीज किलोमीटर डांबरीकरण करणे, पन्नेमारा- सिदेंसूर डांबरीकरण करणे, पन्नेमारा -मूरूमगाव मार्गावर डांबरीकरण करण्या बाबत ठराव मजूंर करण्यात आले.

       त्याच प्रमाणेच पन्नेमारा- रिङवाही, रिङवाही- उमरपाल, उमरपाल- केहकावाही,केहकावाही-मसाद हे सर्व गावातील मार्ग ग्रामपंचायत पन्नेमारा अतंर्गत येत असून या मार्गावर खडीकरण व डांबरीकरण करण्यात बाबत ठराव पारित करण्यात आले.

           याची प्रोसेडीगं करून सबंधित विभागात प्रोसेडीगं कॉपी पाठविण्यात आले आहेत. पण आता पर्यंत शासनाकडून व सबंधित विभागाकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही या करीता – पन्नेमारा ग्रामपंचायत अतंर्गत येणारे गावकरी व नागरिकांनी त्वरीत ठराव मजूंर करण्यात आलेल्या मार्गावरचे निर्माण कार्य करण्यात यावे अशी मागणी केलेली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे इशारा नागरिकांना कडून देण्यात आले आहे.