नांदगाव खंडेश्वर येथे युवकांशी संवाद या उपक्रमातून विविध विषयांवर युवकांशी व जेष्ठ नागरिकांशी संवाद … 

   रोहन आदेवार

साहाय्यक जिल्हा प्रतिनिधी

    यवतमाळ/वर्धा

      वर्धा: कुठे तरी आज कालची पिढी येणाऱ्या युगात भरकटत आहे.दिवसेंदिवस युवा व्यसनाधीनतेकडे आकर्षित होत आहे.कोणी मोबाईलच्या अतिवापराने,कोणाला दारू तंबाखूच्या वेडाने तर कोणाला एकटं रहायचं वेड लागलं आहे, कुठे तरी या गोष्टीला पूर्णविराम लागायला पाहिजे. 

         या युवकांना वेडवृत्तीतून थांबवलं पाहिजे या दृष्टिकोनातून व तरुणांना रोजगाराची वाट दाखवून त्यांच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी आज युवा संवाद कार्यक्रमाचे चर्चासत्र बालरोग तज्ञ तथा जलयोद्धा संस्थापक अध्यक्ष वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे यांनी आयोजन केले होते.

        गजानन महाराज मंदिर, नांदगाव खंडेश्वर येथे संत श्री गजानन महाराज यांचा आशीर्वाद घेऊन, उज्ज्वल भारताचे भविष्य असणाऱ्या तरुणांशी ‘युवा संवाद’ ह्या कार्यक्रमाद्वारे संवाद साधला. दुर्दैवाने युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढत आहे. त्यांच्या प्रगतिकरिता याला पूर्णविराम लागणे अत्यंत गरजेचे आहे.

         युवा पिढीने व्यसनाधीन न होता आत्मविश्वासाने आव्हानांना सामोरे जावे आणि योग्य दृष्टिकोन ठेवून,शेतीच्या व नवीन उपक्रमांद्वारे स्वावलंबी व्हावे, असे याप्रसंगी मार्गदर्शन केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने युवा व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. 

        या चर्चा सत्रामध्ये,”या माध्यमातून करण्यात आलेल्या या प्रयत्नाने,अनेक तरुणांना आपल्या कौशल्याप्रमाणे रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी योग्य दिशा,प्रेरणा व मार्गदर्शन मिळेल,असा विश्वास आयोजक युवा डॉ. सचिन पावडे यांनी व्यक्त केला आहे.