नवजीवन मध्ये जयंती व पुण्यतिथी साजरी…

    ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

       साकोली :- नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल सीबीएसई साकोली येथे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यकमाचे अध्यक्ष प्राचार्य  मुजम्मिल सय्यद, प्रमुख उपस्थिती पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास व प्रशासकीय अधिकारी विनोद किरपान उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण करून करण्यात आली.

           भारतासारख्या खंडप्राय देश्याच्या दिर्घकाळ राहिलेल्या एकमेव महिला पंतप्रधान म्हणजे श्रीमती इंदिरा गांधी. स्वातंत्र्य चळवळीत झोकून देणारी व देश स्वातंत्र्य झाल्यावर त्यासाठी अविरत झटणारी त्यांच्या सारखी पंतप्रधान शोधून मिळणार नाही असे प्रतिपादन केले. त्यांचे उत्तुंग व्यक्तिमत्वाचे गुण विद्यार्थ्यांनी अगिंकारून देशकार्यात मदत करावी तसेच बारडोलीचे सरदार, गुजराथचे सिंह व भारताचे लोहपुरूषाचे आदराने स्मरण करून त्यांच्या गुणांचे अनुकरण करावे असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पुण्यप्रभा उपासे तर आभार वैशाली राउत यांनी केले.