श्री गुरु बापूसाहेब महाराज यांचा आशीर्वाद भाविकांच्या पाठीशी आसल्यामुळे लक्ष्मी नरसिंहाच्या पावन भूमीत भव्य आणि दिव्य मोठा सोहळा चालु आहे.:- ह भ प रामकृष्णदास महाराज लहवितकर.

   बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी

         लक्ष्मीनरसिंह देवस्थानच्या पावन भूमीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय गाथा भजन सोहळा चालु आसुन. सप्ताहाची तिसरी कीर्तन सेवा ह भ प महामंडलेश्वर जगद्गुरु द्वाराचार्य डॉक्टर रामकृष्णदास महाराज लहवितकर यांची झाली. 900 हुन अधिक टाळकरी कीर्तन सेवेसाठी उपस्थित होते. तसेच 7 ते 8 हजार भाविकांच्या उपस्थितीत श्री गुरु बापूसाहेब महाराज देहुकर यांच्या 65 व्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त पुणे, सोलापूर, सातारा, या तीन जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थित असते.

          सर्व भागातील कार्यकर्ते पदाधिकारी व आजी-माजी सरपंच उपसरपंच तसेच आळंदी व देहू संस्थांचे सर्व पदाधिकारी या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या सप्ताहासाठी दररोज किर्तन सेवेसाठी उपस्थितीत आहेत. सप्ताहाचे व्यासपीठ चालक ह भ प अंकुश महाराज रणखांबे विणेकरी वेदमूर्ती आनंद काकडे काका तर श्री शेत्र निरा नरसिंहपुर सप्ताह कमिटीच्या वतीने परीसरातील शंभर हून अधिक गावांचा यामध्ये समावेश आहे.

          सप्ताहासाठी मंगळवार दिनांक 31/ 10 /2023 रोजी ह भ प महामंडलेश्वर जगद्गुरु द्वाराचार्य डॉक्टर रामकृष्णदास महाराज लहवितकर यांची कीर्तन सेवा झाली. हा अभिष्टचिंतन सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहासाठी दररोज आलेल्या सर्व वारकरी भाविक भक्त व श्रोते यांना मोठ्या प्रमाणात अन्नदान सेवा ही दररोज देण्यात येत आहे. व आनंदाने याचा लाभ भाविक घेत आहेत. बुधवार दिनांक 1/ 11 /2023 रोजी श्री गुरु डॉक्टर जयवंत महाराज बोधले धामणगाव यांची कीर्तन सेवा होईल.

          गुरुवार दिनांक 2/ 11/2023 रोजी श्रीगुरु केशव महाराज नामदास पंढरपूरकर यांची कीर्तन सेवा होईल. शुक्रवार दिनांक 3/11/2023 रोजी ह भ प श्री गुरु योगीराज महाराज गोसावी पैठण यांची कीर्तन सेवा होईल शनिवार दिनांक 4/ 11/2023 रोजी ह भ प ज्ञानेश्वर माऊली कदम क्षेत्र आळंदी यांची कीर्तन सेवा होईल.

            शेवटी रविवार दिनांक 5/11/2023 रोजी लक्ष्मी नरसिंहच्या पावन भूमीमध्ये संपूर्ण गाव दिंडी प्रदक्षिणा टाळ आणि मृदंगाच्या आवाजात घेण्यात आल्यानंतर सकाळी 9 ते11 या वेळेत श्रीगुरु बापूसाहेब महाराज देहुकर यांचे काल्याचे किर्तन होईल व सर्व भाविकांसाठी महाप्रसाद देऊन सप्ताहाची सांगता होईल.